जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन दिन उत्साहात
जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन दिन उत्साहात
वाशिम, (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ संघ,
यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा
न्यायालय, वाशिम येथे मराठी भाषा संवर्धन दिन उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र
न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांची उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थितांना मराठी भाषा
संवर्धन दिनाचे अनुषंगाने महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी तदर्थ जिल्हा न्यायाधीश व्ही. व्ही.
नाशिककर व जिल्हा विधिज्ञ संघाचे अध्यक्ष
अॅड. अनुप बाकलीवाल तसेच सरकारी अभियोक्ता अभिजीत व्यवहारे यांची
प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कवी डॉ. विजय काळे यांनी मराठी भाषा संवर्धन दिनाचे अनुषंगाने उपस्थितांना स्वरचीत कविता ऐकवून मराठी भाषा संवर्धन दिनाबाबत माहिती सांगितली. तसेच लेखक प्रा. गजानन वाघ यांनी मराठी भाषा संवर्धन
दिनाचे अनुषंगाने उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मुख्य
लोक अभिरक्षक अॅड.परमेश्वर शेळके यांनी केले तर श्रीमती बारड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमासाठी जिल्हा मुख्यालयातील सर्व न्यायीक अधिकारी, जिल्हा विधि सेवा
प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी, सर्व लोक अभिरक्षक, सरकारी अभियोक्ता, विधिज्ञ मंडळाचे सदस्य, न्यायीक कर्मचारी, विधि स्वयंसेवक, पक्षकार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Comments
Post a Comment