निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याच्या दृष्टीने समन्वयाने काम करावे निवडणूक खर्च निरीक्षक प्रमोद वर्मा यांनी घेतला आढावा
- Get link
- X
- Other Apps
निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याच्या दृष्टीने समन्वयाने काम करावे
निवडणूक खर्च निरीक्षक प्रमोद वर्मा यांनी घेतला आढावा
माध्यम कक्ष व नियंत्रण कक्षाला भेट
वाशिम, दि.३० (जिमाका): भारत निवडणूक आयोगामार्फत १४-यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय महसूल सेवेतील अधिकारी प्रमोद वर्मा यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली असून आज त्यांनी वाशिम जिल्ह्यातील खर्च विषयक कामांचा आढावा घेतला .यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, वाशिम मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके,अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अभिनव बालूरे उपस्थित होते.
श्री. वर्मा यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विषयांसाठी नियुक्त केलेल्या खर्चविषयक नोडल अधिकाऱ्यांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधून निष्पक्ष व निर्भय वातावरणात मतदान पार पाडण्यासाठी वस्तू व सेवा कर विभागाने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. तसेच निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर प्रलोभन दाखवण्यासाठी यु पी आयच्या माध्यमातून पैशांचे वितरण मोठया प्रमाणात होऊ शकते.या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचेही त्यांनी निर्देश दिले .या अनुषंगाने जिल्ह्यातील बँका आणि पोस्ट ऑफिस यांच्या अधिकाऱ्यांसोबतही बैठकीचे नियोजन करण्याचे निर्देश श्री. वर्मा यांनी यावेळी दिले.
निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवारांच्या प्रचार सभांमध्ये होणाऱ्या खर्चाचे सूक्ष्म निरीक्षण करण्याचेही त्यांनी निर्देश दिले. निवडणुकीत दरम्यान अवैध दारू आणि पैशांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते यासाठी जिल्हा पोलीस आणि जिल्हा उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याच्या सीमा भाग तसेच समृद्धी महामार्ग येथेही वाहतुकीचे निरीक्षण करावे, मात्र हे करताना सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याचीही दक्षता घ्यावी असेही श्री.वर्मा म्हणाले.
याप्रसंगी विविध ठिकाणी बंदोबस्त्यासाठी नियुक्त असलेले वेगवेगळ्या पथकांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्यावे अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला केले.
सोशल मीडिया, वृत्त्तपत्रे, केबल नेटवर्ककरून होणारा मोठ्या प्रमाणावर प्रचार पाहता त्याबाबतीत खर्चाची नियमित माहिती माध्यम कक्षाने उपलब्ध करून देण्याचे निर्देशही श्री.वर्मा यांनी दिले.
तसेच लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयांनी कार्य करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर श्री. वर्मा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्थापित नियंत्रण कक्षाला भेट दिली. त्यामध्ये त्यांनी सी विझील कक्ष ,आदर्श आचारसंहिता कक्ष आणि माध्यम प्रमाणीकरण कक्ष तसेच खर्च खर्चविषयक समितीच्या कामांची माहिती घेतली.
००००
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment