Posts

Showing posts from February, 2023

राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियानमोफत मिळणार कोर्सचे प्रशिक्षण उमेदवारांकडून अर्ज मागविले

Image
राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान मोफत मिळणार कोर्सचे प्रशिक्षण उमेदवारांकडून अर्ज मागविले         वाशिम, दि. 28 (जिमाका) :  दिनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान, नगर परिषद, वाशिमअंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमास शासनाकडून मान्यता प्राप्त झाली आहे. हे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळामार्फत प्रशिक्षण पुर्णत्वाचे प्रमाणपत्र, प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी, संबंधित कौशल्य प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केल्यानंतर रोजगार/स्वयंरोजगार वैयक्तिक व्यवसायासाठी बँकेमार्फत अर्थसहाय्याचा लाभ वाशिम शहरातील उमेदवारांना देण्यात येणार आहे.           वाशिम येथील श्री. गणेशा टेक्नॉलाजी, जाधव ले-आऊट, लाखाळा, वाशिम येथे 60 क्षमतेच्या अकाऊंट एक्झीकिटिव्ह कोर्ससाठी प्रवेश देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 3 महिन्याचा असून शैक्षणिक पात्रता इ. 12 वी पास निश्चित केली आहे. याच प्रशिक्षण संस्थेत एलईडी लाईट रिपेअर टेक्निशियन प्रशिक्षणाकरीता 60 उमेदवारांची प्रशिक्षण क्षमता असून या प्रशिक्षणाचा कालावधी 3 महिने आहे. उमेदवार ह

3 मार्च रोजी वैद्यकीय अधिकारी पदासाठी मुलाखती

Image
3 मार्च रोजी वैद्यकीय अधिकारी पदासाठी मुलाखती         वाशिम, दि. 28 (जिमाका) :  जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्या अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ (एम.बी.बी.एस.) कंत्राटी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध न झाल्यास जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी बी.ए.एम.एस वैद्यकीय अधिकारी यांना तात्पुरती नियुक्ती देण्याकरीता कंत्राटी स्वरुपात भरण्याकरीता 3 मार्च 2023 रोजी थेट मुलाखतीचे आयोजन अपर जिल्हाधिकारी, वाशिम यांच्या दालनात सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. विशेषतज्ञ शाखेतील पदव्युत्तर पदविका/पदवीधारक उमेदवारास विशेष प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक, वाशिम यांनी कळविले आहे.     *******

मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त कायदेविषयक शिबिर संपन्न

Image
मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त  कायदेविषयक शिबिर संपन्न  वाशिम, दि. 27 (जिमाका) मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त आज 27 फेब्रुवारी रोजी  विदाता भवन,वाशिम येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विजय टेकवानी होते.यावेळी प्रफुल्ल इटाल,टेली लॉयर ॲड.शुभांगी खडसे,जगदीश मानवतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.        श्री. टेकवानी यांनी कायदेविषयक शिबिरातून प्रत्येकाने ज्ञान घेऊन इतरांना सुध्दा जागरुक करावे, माहिती अधिकाराचा सदुपयोग होणे गरजेचे आहे.कायदा हा चांगल्या उद्देशाने बनतो.त्याचा फक्त चांगलाच वापर व्हायला हवा. राज्यघटनेत नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचे उल्लेख असून त्याचे पालन सर्वांनी करावे असे सांगितले.        ॲड. शुभांगी खडसे यांनी महाराष्ट्र राज्य नागरी सेवा हक्क कायदा 2015 विषयी आणि जगदिश मानवतकर यांनी माहिती अधिकार कायदा 2005 या विषयावर मार्गदर्शन केले. संचालन आणि आभार विधी स्वयंसेवक राजकुमार पडघान यांनी मानले.यशस्वीतेसाठी विधी सेवा प्राधिकरणचे अधिक्षक संजय भुरे, गणेश गायकवाड

जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समिती सदस्यांची निवडीसाठी 20 मार्चपर्यंत अर्ज मागविले

Image
जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समिती सदस्यांची निवडीसाठी 20 मार्चपर्यंत अर्ज मागविले        वाशिम, दि. 24 (जिमाका) : जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समिती, वाशिम या समितीवर अशासकीय सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. या समितीसाठी जिल्हयातील पशुमित्र अथवा सेवाभावी संस्थेत कार्य करणाऱ्या नागरीकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत 20 मार्च 2023 आहे. इच्छुकांनी आधार कार्ड, पशुमित्र अथवा सेवाभावी संस्थेत काम करीत असल्याचा पुरावा या कागदपत्रांसह विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा पशुसवंर्धन उपायुक्त कार्यालय, वाशिम येथे सादर करावा.           जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समितीवर अशासकीय सदस्यांची संख्या पुढीलप्रमाणे राहील. जिल्हयातील गोशाळा व पांजरपोळ संस्थांपैकी एका संस्थेचा अध्यक्ष - 1, प्राणी कल्याणविषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे सदस्य- 2, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशित केलेल्या व्यक्ती- 2 आणि मानवहितकारक कार्य करणारे, प्राण्यांवर प्रेम करणारे व प्राणी कल्याणासाठी काम करणारे -6 याप्रमाणे राहील. असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, वाशिम यांनी कळविले आहे. *******

पालकमंत्री संजय राठोड यांचा दौरा कार्यक्रम

Image
पालकमंत्री संजय राठोड यांचा दौरा कार्यक्रम  वाशिम दि.24 (जिमाका) पालकमंत्री संजय राठोड हे 25 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता दारव्हा येथून मोटारीने मानोरा तालुक्यातील कारखेडाकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता श्रीक्षेत्र कारखेडा येथे आगमन व श्री शंकरगिरी महाराज यांच्या 112 व्या समाधी सोहळ्यानिमित्त संगीतमय भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला उपस्थित राहून सायंकाळी 7 वाजता दारव्हा तालुक्यातील धामणगाव(देव)कडे प्रयाण करतील.

मंगरुळपीर येथे 28 पानटपरींवर धडक कारवाई

Image
मंगरुळपीर येथे 28 पानटपरींवर धडक कारवाई         वाशिम, दि. 24 (जिमाका) :  राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत आज 24 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, मंगरुळपीर आणि पोलीस स्टेशन, मंगरुळपीर यांच्या संयुक्त वतीने कोटपा 2003 च्या कायद्याअंतर्गत 28 पानटपरीधारकांवर कलम 6 (अ) व 6 (ब) अंतर्गत दंडात्मक कारवाई करुन 5 हजार 600 रूपयांचा दंड वसुल करण्यात आला. यावेळी मंगरुळपीर येथील अकोला चौक, मानोरा चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. आदित्य पांढारकर, मानसशास्त्रज्ञ राम सरकटे, सामाजिक कार्यकर्ते राम धाडवे, पोलीस कॉन्स्टेबल श्री. चिस्तळकर, अविनाश कुकडे, महेश बारगडे, लोकेश राठोड, पुनर्वसन कर्मचारी व ग्रामीण रुग्णालय, मंगरुळपीर येथील कर्मचाऱ्यांचा या कारवाईमध्ये सहभाग होता. *******

वाघोळा व दिघीत दिली कलापथकाने समाज कल्याण योजनांची माहिती

Image
वाघोळा व दिघीत दिली कलापथकाने समाज कल्याण योजनांची माहिती      वाशिम दि.२४(जिमाका) जिल्हा माहिती कार्यालय,वाशिमच्या वतीने अनुसूचित जाती उपयोजना सन २०२२-२३ अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांच्या योजनांची माहिती सूर्यलक्ष्मी संस्थेचे प्रमुख शाहीर विलास भालेराव व त्यांच्या सहकारी कलावंतांनी कलापथक कार्यक्रमांमधून कारंजा तालुक्यातील वाघोळा व दिघी येथे नुकतीच दिली.            शाहीर भालेराव व त्यांच्या कलावंतांनी  ग्रामस्थांना मार्जिन मनी योजना,कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना,डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना,अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींसाठी निवासी शाळा, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती, कन्यादान योजना,आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार,अनुसूचित जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा, मुला-मुलीसाठी शासकीय वसतीगृहे, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ‘समता’ दिनदर्शिकेचे प्रकाशन

Image
पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते      ‘समता’ दिनदर्शिकेचे प्रकाशन                                        वाशिम, दि. 24 (जिमाका) :  पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते 23 फेब्रुवारी रोजी पोहरादेवी येथील नंगारा वास्तु संग्रहालय परिसरात आयोजित कार्यक्रमात जिल्हा माहिती कार्यालय, वाशिमने अनुसूचित जाती उपयोजना सन 2022-23 अंतर्गत तयार केलेल्या निवडक महत्वपूर्ण बारा योजनांची माहितीचा समावेश असलेल्या ‘समता’ सन 2023 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व यवतमाळ येथील डॉ. टी.सी. राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.          ‘समता’ दिनदर्शिकामध्ये सन 2023 मध्ये महिनानिहाय आलेल्या शासकीय सुट्टयांचा समावेश आहे. ‘समता’ दिनदर्शिकेच्या मुखपृष्ठावर महात्मा ज्योतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असून मध्यभागी समाज कल्याण विभागाचे बोधचिन्ह दिसून येते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आणि जिल्हयाच्या स्थापनेला यावर्षी 25 वर्ष पुर्ण होत अस

पोहरादेवी व उमरी तिर्थक्षेत्र विकास आराखडयातील कामे तातडीने सुरु करण्याचे नियोजन करा - पालकमंत्री संजय राठोड

Image
पोहरादेवी व उमरी तिर्थक्षेत्र विकास आराखडयातील कामे तातडीने सुरु करण्याचे नियोजन करा                              - पालकमंत्री संजय राठोड         वाशिम, दि. 24 (जिमाका) :  श्रीक्षेत्र पोहरोदवी येथील श्री. संत सेवालाल महाराज तिर्थक्षेत्र विकास आराखडा आणि उमरी व पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखडयातंर्गत करण्यात येणारी सर्व कामे निर्धारीत वेळेत पुर्ण करण्यासाठी   तातडीने सुरु करण्याचे नियोजन करा. असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी संबंधित यंत्रणांना दिले.           23 फेब्रुवारी रोजी पोहरादेवी येथील नंगारा वास्तू संग्रहालय येथे श्री. संत सेवालाल महाराज तिर्थक्षेत्र विकास आराखडा आणि पोहरादेवी व उमरी विकास आराखडयाशी संबंधित कामाबाबत आयोजित आढावा सभेत पालकमंत्री श्री. राठोड बोलत होते. सभेला राज्याचे माजी पोलीस महासंचालक तथा गुरुव्दारा बोर्ड, नांदेडचे प्रशासक डॉ. पी.एस. पसरीचा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, प्रसिध्द वास्तू विशारद अमरदिप बहल, गुरुव्दारा बोर्ड, नांदेडचे संचालक श्री. जसबीरसिंग, यवतमाळचे डॉ. टी.सी. राठोड, सार्वजनिक

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम14 पानटपरी धारकांवर कारवाई

Image
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम 14 पानटपरी धारकांवर कारवाई         वाशिम, दि. 22 (जिमाका) :  राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय, वाशिमअंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली आज 22 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांच्या संयुक्त वतीने कोटपा 2003 च्या कायद्याअंतर्गत 14 पानटपरीधारकांवर दंडात्मक कारवाई करुन 3 हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आला. यावेळी जिल्हा रुग्णालय परिसर,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, मालतीबाई सरनाईक विद्यालय, बसस्थानक, अकोला नाका आदी ठि‍काणी कारवाई करण्यात  आली. कारवाईमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. आदित्य पांढारकर,मानसशास्त्रज्ञ राम सरकटे, सामाजिक कार्यकर्ते राम धाडवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक राजेश राठोड, पोलीस कॉन्स्टेबल डिगांबर मोरे,अविनाश वाढे यांचा सहभाग होता. *******

स्थानिक सुट्या जाहीर

Image
स्थानिक सुट्या जाहीर         वाशिम, दि. 22 (जिमाका) :  सन 2023 या वर्षातील तीन स्थानिक सुट्या जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जाहीर केल्या आहे. यामध्ये 14 सप्टेंबर- पोळा, 22 सप्टेंबर- ज्येष्ठागौरी पुजन आणि 13 नोव्हेंबर- लक्ष्मीपूजना नंतरचा दुसरा दिवस या सुट्ट्यांचा समावेश आहे. हा आदेश जिल्हयातील दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि अधिकोष यांना लागू राहणार नाही. असे आदेशात नमुद आहे. *******

अपघातांची संख्या 30 टक्क्यांनी कमी करण्यासाठी परिवहन विभागाची विशेष मोहिम अपघातमुक्त जिल्ह्यासाठी पुढाकार

Image
अपघातांची संख्या 30 टक्क्यांनी कमी करण्यासाठी परिवहन विभागाची विशेष मोहिम अपघातामुक्त जिल्ह्यासाठी पुढाकार         वाशिम, दि. 22 (जिमाका) :  जिल्हयात वाहनांच्या संख्येत व त्याअनुषंगाने रस्त्यावरील वाहने अपघाताच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आजपर्यंत 2 लक्ष 76 हजार 635 खाजगी वाहने व 15 हजार 214 मालवाहू व प्रवासी वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्हयातील रस्त्याची स्थिती चांगली असल्याने बहूतांशी रस्ते, महामार्ग सिमेंट काँक्रीटचे बनले आहे.त्यामुळे वाहन चालकाने वाहने अतिवेगाने भरधाव चालविणे,सिटबेल्टचा वापर न करणे,दुचाकी चालकाने हेल्मेट वापरत नसल्यामुळे बहुतांश अपघात होत आहे.      जिल्हयात 2022 या वर्षात एकूण 324 वाहनांचे अपघात घडले आहे. त्यामध्ये 174 लोक मृत्यूमुखी व 242 गंभिररित्या जखमी झाले.जखमींपैकी अनेकांना कायमचे अपगंत्व आले. अपघात झाल्यानंतर त्यामध्ये कुटूंबातील व्यक्तीचा जीव गमावल्यामुळे सर्व कुटूंबावर प्रचंड आर्थिक व मानसिक आघात होतो, त्याची हानी होते, ती कधीच भरुन निघणारी नसते.अपघातामध्ये बऱ्याचदा अन्य वाहन चालकांचासुध्दा दोष असतो.  

किमान कौशल्य विकास कार्यक्रम प्रशिक्षणासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव आमंत्रित

Image
किमान कौशल्य विकास कार्यक्रम प्रशिक्षणासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव आमंत्रित          वाशिम, दि. 22 (जिमाका) :   कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागातंर्गत जिल्हयातील युवक-युवर्तीचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करुन त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियान राबविण्यात येते.जिल्हयातील विशिष्ट भौगोलिक तथा सामाजिक स्थिती, परंपरागत व्यवसाय, नैसर्गिक संसाधने तथा साधनसामुग्री इत्यादींच्या आधारे जिल्हयातील रोजगार/स्वयंरोजगारासाठी अधिक मागणी असलेली क्षेत्रे निश्चित करुन त्यानूसार कौशल्य विकास प्रशिक्षण (अभ्यासक्रम) राबविण्यासाठी किमान कौशल्य विकास कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येते.           सन २०२२-२३ मध्ये किमान कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत जिल्हयातील रोजगार/स्वयंरोजगार इच्छूक उमेदवारांना वैविध्यपूर्ण व नाविन्यपूर्ण जॉबरोल्समध्ये (अभ्यासक्रम) प्रशिक्षण उपलब्ध होण्यासाठी ज्या प्रशिक्षण संस्था स्किल इंडीया पोर्टलवर सूचिबध्द आहेत. जिल्हयात गुणवत्ताप

24 फेब्रुवारी रोजी कामरगांव येथेस ंत्रा पिकासाठी कार्यशाळा

Image
24 फेब्रुवारी रोजी कामरगांव येथे संत्रा पिकासाठी कार्यशाळा         वाशिम, दि. 22 (जिमाका) :  कारंजा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,वाशिम यांच्या मार्गदर्शनात तालुका कृषी अधिकारी कारंजा व कारंजा तालुका कृषी व्यावसायीक संघाच्या वतीने संत्रा पिकासाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळा 24 फेब्रुवारी 2023 रोजी कामरगाव येथील ग्रामपंचायत भवन येथे आयोजित केली आहे. या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी करडा येथील कृषी विज्ञान केंद्राचे फळबाग तज्ञ निवृत्ती पाटील व मोर्शी येथी प्रगतशील व अनुभवी शेतकरी प्रवीण बेलखेडे हे मार्गदर्शन करणार आहे. प्रगतशील शेतकऱ्यांचे शेतावर प्रक्षेत्र भेटसुध्दा राहणार आहे. कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उप विभागीय कृषी अधिकारी निलेश ठोंबरे व तालुक्यातील सर्व प्रगतशील संत्रा उत्पादक शेतकरी हजर राहणार आहे. तरी शेतकरी बांधवांनी या कार्यशाळेचा *******

सामाजिक न्याय भवन येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

Image
सामाजिक  न्याय भवन येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न         वाशिम, दि. 22 (जिमाका) :  सामाजिक न्याय भवन,वाशिम येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन 20 फेब्रुवारी रोजी करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त डॉ.छाया कुलाल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विजय टेकवानी,टेली लॉयर ॲड. शुभांगी खडसे,ॲड. किरण राऊत,राजकुमार पडघान,रोशनी चोपडे व किन्नर प्रतिनिधी करीना आडे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करून करण्यात आली.           डॉ.कुलाल यांनी तृतीयपंथी यांना समाजात समान दर्जा मिळायला हवा,समाजाने त्यांचा आदर करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.        श्री. टेकवानी यांनी तृतीयपंथी यांना मोफत विधी सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.समाजाचा तृतीयपंथी यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे. असे सांगितले.        विश्व सामाजिक न्याय दिन या विषयावर राजकुमा

28 फेब्रुवारीला मानोरा येथे रोजगार मेळावा

Image
28 फेब्रुवारीला मानोरा येथे रोजगार मेळावा        वाशिम, दि. 22 (जिमाका) : राज्यातील नामांकित नियोक्त्यांकडून प्राप्त मनुष्यबळ मागणीनुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केन्द्र, वाशिम कार्यालयाकडुन पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा २८ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.ज्या उमेदवारांना प्रत्यक्ष रोजगार मेळयाव्याला उपस्थित राहून त्यांनी ऑफलाईन रोजगार मेळाव्याला २८ फेब्रुवारी रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था,मानोरा येथे उपस्थित रहावे.या रोजगार मेळाव्यात जिल्हयासह राज्यातील औरंगाबाद येथील परम स्किल्स ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,अमरावती येथील पिपल ट्री व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एल.आय.सी.ऑफ इंडिया शाखा वाशिम येथील नामांकित आस्थापना/कंपन्यांमध्ये १०० रिक्त जागेवर रोजगार मिळविण्याची संधी जिल्हयातील नोकरी इच्छुक उमेदवारांना याद्वारे प्राप्त होणार आहे.            जिल्हयातील रोजगार इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवारांना www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी होता येणार

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2022 साठी प्रवेशिका मागविल्या 8 मार्चपर्यंत मुदतवाढ

Image
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2022 साठी प्रवेशिका मागविल्या  8 मार्चपर्यंत मुदतवाढ         वाशिम, दि. 21 (जिमाका) :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता,उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा,उत्कृष्ट छायाचित्रकार,समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका 31 जानेवारी 2023 पर्यंत सादर करण्याची अंतिम तारीख देण्यात आली होती. आता या प्रवेशिका मागविण्यास मुदतवाढ देण्यात आली असून आता प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 8 मार्च 2023 असा आहे.            उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2022 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने  शासनाच्या  www.maharashtra. gov.in    आणि महासंचालनालयाच्या  dgipr. maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्य

इ. 12 वी आणि इ. 10 वीच्या परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटीसाठी भरारी पथके

Image
इ. 12 वी आणि इ. 10 वीच्या परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटीसाठी भरारी पथके         वाशिम, दि. 21 (जिमाका) :  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इ. 12 वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत जिल्हयातील 71 परीक्षा केंद्रावर होणार आहे. माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच इ. 10 वीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत जिल्हयातील 87 परीक्षा केंद्रावर होणार आहे. या परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी देण्याकरीता भरारी पथके गठीत करण्यात आली आहे. या पथकामध्ये पथक क्र. 1 मुख्य कार्यकारी अधिकारी, पथक क्र. 2 जिल्हा पोलीस अधिक्षक, पथक क्र. 3 उपविभागीय अधिकारी, वाशिम, पथक क्र. 4 उपविभागीय अधिकारी, कारंजा, पथक क्र.5 उपविभागीय अधिकारी, मंगरुळपीर, पथक क्र. 6 उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम, पथक क्र. 7 उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा, पथक क्र. 8 उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगरुळपीर, पथक क्र. 9 उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जि.प. वाशिम, पथक क्र. 10 उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग) जि. प. वाश

वाशिम-हिंगोली मार्गावरील रेल्वे ट्रॅक दूरुस्ती वाहतूकीकरीता पर्यायी मार्गाची व्यवस्था

Image
वाशिम-हिंगोली मार्गावरील रेल्वे ट्रॅक दूरुस्ती वाहतूकीकरीता पर्यायी मार्गाची व्यवस्था         वाशिम, दि. 21 (जिमाका) :  वाशिम- हिंगोली रोडवरील क्रॉसींग गेट क्र. 115 वरील रेल्वे ट्रॅकचा काही भाग खराब झाल्यामुळे रेल्वे ट्रॅकवरुन रेल्वे आणि इतर वाहने सुरळीत ये-जा करण्यासाठी त्याची दुरुस्ती करण्यात येणार असल्यामुळे या ट्रॅकवरील वाहतूक 23 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजतापासून ते 24 फेब्रुवारी 2023 पर्यंतच्या सकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 6 तासाकरीता वाशिम-हिंगोली रोड पुर्णपणे बंद राहणार आहे.           वाशिम-हिंगोली रोडवरील क्रॉसींग गेट क्र. 115 वरील रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती ट्रॉफीक सुरु असतांना करणे शक्य नसल्याने, वाशिम-हिंगोली रोडवरील वाहतूक पुर्णपणे बंद करुन पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (ख) नुसार 23 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजतापासून ते 24 फेब्रुवारी 2023 पर्यंतच्या सकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 6 तासाकरीता पुढीलप्रमाणे वाशिम-हिंगोली मार्गावरील वाहतूक प्रस्तावित मार्गावर वाहतूक वळविण्याबाबत आदेश जार

प्रधानमंत्री स्वनिधी कर्ज योजना फेरीवाल्यांसाठी 23 फेब्रुवारी रोजीला शिबीर

Image
प्रधानमंत्री स्वनिधी कर्ज योजना फेरीवाल्यांसाठी 23 फेब्रुवारी रोजीला शिबीर         वाशिम, दि. 20 (जिमाका) :  वाशिम शहरातील सर्व फेरीवाल्यांकरीता वित्तीय समावेशन ते सशक्तीकरण अंतर्गत नगर परिषद, वाशीमच्या वतीने कर्ज मेळावा शिबिर आयोजित केले आहे. शहरातील फेरीवाल्यांचे मोबाईल ॲपव्दारे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. प्रधानमंत्री स्वनिधी कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी २३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत नगर परिषद वाशीम अंतर्गत शहर उपजीविका केंद्र, युनियन बँकेच्या मागे, बालाजी संकुल, वरचा मजला, पाटणी चौक, वाशीम येथे सर्व बँक व्यवस्थापक यांच्या उपस्थितीत कर्ज शिबिर आयोजित करण्यात आले आहे.          फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याकरीता सुविधा आहे. पात्र फेरीवाले यांनी आपले कागदपत्रे घेऊन ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा. या शिबिराच्या दिवशी बँक व्यवस्थापक यांच्या उपस्थितीत कर्ज मंजूर होणार आहे. तरी यापूर्वी बँकेत अर्ज केलेला असल्यास अर्ज बँकेकडे प्रलंबित असल्यास अर्ज केलेल्या अर्जाची एक प्रत शिबिराच्या दिवशी घेऊन यावी. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा क

शासकीय तंत्रनिकेतन येथे रक्तदान शिबिर संपन्न

Image
शासकीय तंत्रनिकेतन येथे रक्तदान शिबिर संपन्न         वाशिम, दि. 20 (जिमाका) :  शासकीय तंत्रनिकेतन वाशिम येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व शिवजयंती निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत व जलसंपदा विभाग, वाशीम यांच्या संयुक्त वतीने १९ फेब्रुवारी रोजी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी, वाशीम यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये सामाजिक जाणीवेतून एकूण ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये जलसंपदा विभागाचे व संस्थेमधील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.          रक्तदान शिबिराच्या उदघाटनाला संस्थेचे प्राचार्य डॉ.बी.जी. गवलवाड, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक, प्रमोद मादाडे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ए.एल. पाठक, विभाग प्रमुख ए.डी.ढोले, एनएसएस समन्वयक यु. ए.नागे, बी.बी. लव्हाळे, डॉ. आर. बिलोलीकर, व्ही. एस जोशी, जिल्हा सामान्य रुग्णालयातील चमू व संस्थेतील विद्यार्थी उपस्थित होते.          प्राचार्य श्री. गवलवाड म्हणाले, आपण स्वतः रक्तदान केल्यामुळे कुणाचा तरी जीव वाचवू शकतो. त्यामुळे रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे.

समाज कल्याण कार्यालयातnछत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Image
समाज कल्याण कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी         वाशिम, दि. 20 (जिमाका) :  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम यांच्या संयुक्त वतीने 19 फेब्रुवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमाचे आयेाजन करण्यात आले. उपस्थितांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून नुकतेच राज्यगीत म्हणून स्विकृत केलेले ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीताचे गायन केले. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण व दीप प्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले.           प्रमुख वक्ते विशाल नंदागवळी यांनी छत्रपती शिवाजी महाराज एक युग प्रवर्तक राजे असून त्यांच्या विचारांची गरज आज सुध्दा असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी महिला, शेतकरी तसेच सामान्य जनतेसाठी विविध उपाययोजना करुन त्यांना सुरक

एरंडा येथे फार्म लॅब प्रशिक्षण केंद्राचे प्रधान सचिव श्री.डवले यांच्या हस्ते उद्घाटन

Image
एरंडा येथे फार्म लॅब प्रशिक्षण केंद्राचे  प्रधान सचिव श्री.डवले यांच्या हस्ते उद्घाटन वाशिम दि.18 (जिमाका) मालेगाव तालुक्यातील एरंडा येथील जय किसान शेतकरी बचतगट एरंडा यांनी मानव विकास मिशन अंतर्गत  उभारलेल्या फार्म लॅब प्रशिक्षण केंद्राचा उद्घाटन 17 नोव्हेंबर रोजी  कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी फित कापून केले.यावेळी अमरावती विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक श्री किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार,फार्म लॅब वैज्ञानिक तथा फार्म लॅब पुणे संचालक डॉ.संतोष चव्हाण व एरंडा सरपंच प्रताप घुगे, यांची प्रमुख उपस्थिती होती.        श्री डवले यांनी प्रयोगशाळेची पाहणी करून  त्या ठिकाणी होत असलेल्या विविध जैविक निविष्ठांविषयी माहिती जाणून घेतली. फार्म लॅबमध्ये मल्टिप्लिकेशन होणारे जिवाणूंची वाढ होणाऱ्या विविध निविष्ठांची निर्मिती करावी. प्राकृतिक शेतीवर शासनाचा भर असून जैविक शेतीमध्ये शेतकऱ्यांना  याद्वारे खूप मोठी मदत होऊ शकते असेही श्री. डवले यावेळी म्हणाले.           फार्म लॅब उपक्रमाची प्रशंसाही त्यांनी केली.अशाप्रकारे शेतकऱ्याचे उत्पादन खर्च कमी क

म्हसोला येथे कलावंतांनी दिली समाज कल्याण योजनांची माहिती

Image
म्हसोला येथे कलावंतांनी दिली समाज कल्याण योजनांची माहिती         वाशिम, दि. 17 (जिमाका) :  मंगरुळपीर तालुक्यातील म्हसोला या गावी 16 फेब्रुवारी रोजी महात्मा फुले बहु. संस्थेच्या कलापथकाने गावातील लाभार्थ्यांना व ग्रामस्थांना समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांचे प्रबोधन करुन दिली. कलापथक प्रमुख शाहिर संतोष खडसे यांनी व त्यांच्या सहकारी कलावंतांनी ग्रामस्थांना मार्जिन मनी योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कन्यादान योजना, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा, मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृह योजना, शेळी गट वाटप योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा करणे, अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींसाठी निवासी शाळा, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व दिव

वाशिम तालुक्यात कलापथकांनी दिली समाज कल्याण योजनांची माहिती

Image
वाशिम तालुक्यात कलापथकांनी दिली समाज कल्याण योजनांची माहिती         वाशिम, दि. 17 (जिमाका) :  शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहे. लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळाली तर ते निश्चितच योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येतील. योजनांच्या लाभामुळे त्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. लाभार्थ्यांनी योजनांची माहिती जाणून घेवून योजनांचा लाभ घ्यावा. या उद्देशाने समाज कल्याण विभागाच्या महत्वपूर्ण निवडक योजनांची माहिती जिल्हा माहिती कार्यालय, वाशिमच्या वतीने कलापथकाच्या माध्यमातून ग्रामस्थांचे व लाभार्थ्यांचे प्रबोधन करुन मनोरंजनातून देण्यात येत आहे. अशाच प्रकारे वाशिम तालुक्यातील निवडक काही गावात कलापथक कार्यक्रमाच्या माध्यमातून योजनांची माहिती दिली जात आहे.          वाशिम तालुक्यातील अडगांव (खु.), कोकलगांव, अंजखेडा, बोराळा (हिस्से), बाभुळगांव, फाळेगांव, सोंडा, ढिल्ली, आसोला व भटउमरा या गावी भरारी सांस्कृतीक व ग्रामीण विकास बहु. संस्थेच्या कलापथक प्रमुख कलावंत विद्या भगत व निरंजन भगत व त्यांच्या सहकारी कलावंतांनी ग्रामस्थांचे व लाभार्थ्यांचे मनोरंजन करुन प्

1 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

Image
1 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश         वाशिम, दि. 17 (जिमाका) :  जिल्हयात 19 फेब्रुवारीपर्यंत मंगरुळपीर येथे बिरबलनाथ महाराज यांची यात्रा आहे. 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सव व 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव जिल्हयात साजरा करण्यात येणार आहे. सद्यास्थितीत जिल्हयात विविध पक्ष/संघटना/ सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून वेगवेगळया मागण्याकरीता धरणे/आंदोलने/उपोषणे करण्यात येत आहे. मागील काही दिवसात जिल्हयात घडलेल्या जातीय घटनेच्या अनुषंगाने निषेधात्मक आंदोलने, बंद व मोर्चाचे विविध राजकीय व धार्मिक संघटनांकडून आयोजन करण्यात येत आहे. जिल्हा सण-उत्सवाच्या व राजकीय दृष्टिने संवेदनशील आहे. सण उत्सवाच्या काळात जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे सोयीचे व्हावे, यासाठी 15 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी लागू केले आहे. हे आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय/निमशासकीय अधिकारी- कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिल

सवड निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी डिजीटल रथावरुन जाणून घेतली योजनांची माहिती

Image
सवड निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी डिजीटल रथावरुन जाणून घेतली योजनांची माहिती         वाशिम, दि. 17 (जिमाका) :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निवडक महत्वपूर्ण योजनांवर जिल्हा माहिती कार्यालय, वाशिमने दिशा परिवर्तनाची हा यशोगाथा मांडणारा माहितीपट आणि 8 ऑडीओ-व्हिडीओ जिंगल्स तयार केले आहे. जिल्हयात डिजीटल रथाच्या माध्यमातून हा माहितीपट आणि ऑडिओ-व्हिडीओ जिंगल्स जिल्हयातील विविध गावात, शाळा, महाविद्यालयात तसेच सार्वजनिक ठिकाणी दाखविण्यात येत आहे. नुकतेच रिसोड तालुक्यातील सवड येथील समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळा आणि वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी डिजीटल रथावरुन समाज कल्याण विभागाच्या महत्वपूर्ण योजनांची माहिती हा माहितीपट आणि ऑडिओ-व्हिडीओ जिंगल्स बघून जाणून घेतली.           उपस्थित निवासी शाळा आणि वसतीगृहाच्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनाचे वाटप, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, रमाई घरकुल योजना, मुला-मुलींसाठी वसतीगृहे योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर