एरंडा येथे फार्म लॅब प्रशिक्षण केंद्राचे प्रधान सचिव श्री.डवले यांच्या हस्ते उद्घाटन

एरंडा येथे फार्म लॅब प्रशिक्षण केंद्राचे 
प्रधान सचिव श्री.डवले यांच्या हस्ते उद्घाटन

वाशिम दि.18 (जिमाका) मालेगाव तालुक्यातील एरंडा येथील जय किसान शेतकरी बचतगट एरंडा यांनी मानव विकास मिशन अंतर्गत  उभारलेल्या फार्म लॅब प्रशिक्षण केंद्राचा उद्घाटन 17 नोव्हेंबर रोजी  कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी फित कापून केले.यावेळी अमरावती विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक श्री किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार,फार्म लॅब वैज्ञानिक तथा फार्म लॅब पुणे संचालक डॉ.संतोष चव्हाण व एरंडा सरपंच प्रताप घुगे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
       श्री डवले यांनी प्रयोगशाळेची पाहणी करून  त्या ठिकाणी होत असलेल्या विविध जैविक निविष्ठांविषयी माहिती जाणून घेतली. फार्म लॅबमध्ये मल्टिप्लिकेशन होणारे जिवाणूंची वाढ होणाऱ्या विविध निविष्ठांची निर्मिती करावी. प्राकृतिक शेतीवर शासनाचा भर असून जैविक शेतीमध्ये शेतकऱ्यांना  याद्वारे खूप मोठी मदत होऊ शकते असेही श्री. डवले यावेळी म्हणाले. 
         फार्म लॅब उपक्रमाची प्रशंसाही त्यांनी केली.अशाप्रकारे शेतकऱ्याचे उत्पादन खर्च कमी करणारे उपक्रम राबविण्यासाठी शासन अवश्य मदत करेल असे यावेळी त्यांनी सांगितले.  
           या कार्यक्रमांमध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त गोष्टी तृणधान्य दिवसाचेही आयोजन करण्यात आले होते.यामध्ये तृणधान्याची ओळख आणि जनजागृती करण्यात आली. यावेळी मान्यवरांना पौष्टिक तृणधान्याचे पॅकेट भेट देण्यात आले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील तंत्र अधिकारी दिलीप कंकाळ,कारंजा तालुका कृषी अधिकारी संतोष चौधरी, मालेगाव तालुका कृषी अधिकारी विलास वाघ, रिसोड तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत उलेमाले,तसेच कृषी विभागाचे संजय इरकर, रवी मापारी, 
गजानन मालस,श्री मगर व इतर कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी हे प्रामुख्याने उपस्थित होते.
     कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे कर्मचारी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे,सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री इंगोले,श्री राऊत,  जिल्ह्यातील शेत बांधावरील प्रयोगशाळा संचालक विजय घुगे, दीपक घुगे,मनोहर सांगळे,राजू इंगळे , विठ्ठल ईडोळे,गणेश ईडोळे,गोपाल ठाकरे,अमोल वानखेडे,मुंगशीराम उपाध्ये,गजानन बाजड,नीरज पांडे  वाशिम जिल्हा फार्म ग्रुपचे शेतकरी तसेच एरंडा फार्म लॅबचे सर्व शेतकऱ्यांनी यांनी परिश्रम घेतले.     
      कार्यक्रमास जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील बहुसंख्य सेंद्रिय शेती उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपले सेंद्रिय शेतीचे अनुभव सांगितले.प्रकल्प संचालक आत्मा वाशिम,महाराष्ट्र शासन कृषी विभाग,फार्म लॅब,जय किसान शेतकरी गट एरंडा व फार्म लॅब ग्रुप वाशिम जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश