राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम14 पानटपरी धारकांवर कारवाई
- Get link
- X
- Other Apps
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम
14 पानटपरी धारकांवर कारवाई
वाशिम, दि. 22 (जिमाका) : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय, वाशिमअंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली आज 22 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांच्या संयुक्त वतीने कोटपा 2003 च्या कायद्याअंतर्गत 14 पानटपरीधारकांवर दंडात्मक कारवाई करुन 3 हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आला. यावेळी जिल्हा रुग्णालय परिसर,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, मालतीबाई सरनाईक विद्यालय, बसस्थानक, अकोला नाका आदी ठिकाणी कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. आदित्य पांढारकर,मानसशास्त्रज्ञ राम सरकटे, सामाजिक कार्यकर्ते राम धाडवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक राजेश राठोड, पोलीस कॉन्स्टेबल डिगांबर मोरे,अविनाश वाढे यांचा सहभाग होता.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment