20 फेब्रुवारी रोजी महिला लोकशाही दिन
- Get link
- X
- Other Apps
20 फेब्रुवारी रोजी
महिला लोकशाही दिन
वाशिम, दि. 17 (जिमाका) : समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांचे तक्रारी व अडचणीचे शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हासतरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यखतेखाली प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.
माहे, फेब्रुवारी 2023 चा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 20 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात येत असल्याची माहिती सदस्य सचिव, जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, वाशिम यांनी दिली.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment