इ. 5 वी प्रवेश निवड चाचणी अर्जास 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ



इ. 5 वी प्रवेश निवड चाचणी

 अर्जास 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

       वाशिम, दि. 08 (जिमाका) : जवाहर नवोदय विद्यालय, वाशिम इयत्ता 5 वीच्या प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा सत्र 2022-23 या वर्षासाठीचे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख प्रशासकीय कारणास्तव 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे वर्ग 5 वी मध्ये शिक्षण घेतल असलेले विद्यार्थी  www.navodaya.gov.in किंवा www.cbseitms.rcil.gov.in/nvs या संकेत स्थाळावर भेट देवून विनामूल्य अर्ज करु शकतात.
         ऑनलाईन दूरुस्तीसाठी खिडकी 16 व 17 फेब्रुवारी 2023 ला उघडली जाईल. जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2023 साठी नोंदणीकृत उमेदवारांच्या डेटामधील दुरुस्त्या फक्त लिंग (पुरुष/महिला), श्रेणी (जनरल / ओबीसी / एससी/एसटी), क्षेत्र (ग्रामीण/शहरी) अपंगत्व आणि परीक्षेचे माध्यम यासाठी परवानगी राहील. असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.डी. खरात यांनी कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश