पालकमंत्री संजय राठोड यांचा दौरा कार्यक्रम
पालकमंत्री संजय राठोड यांचा दौरा कार्यक्रम
वाशिम दि. 11(जिमाका) पालकमंत्री संजय राठोड हे 12 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी 8 वाजता यवतमाळ निवासस्थान येथून शासकीय वाहनाने मानोरा तालुक्यातील उमरीकडे प्रयाण. सकाळी 9:30 वाजता उमरी येथे आगमन.सकाळी 10 वाजता सामकी माता मंदिर येथे आगमन व दर्शन.ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थिती. सकाळी 10:30 वाजता संत जेतालाल महाराज मंदिर येथे आगमन व दर्शन. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न होणाऱ्या संत जेतालाल महाराज मंदिर परिसरात होणाऱ्या विकास कामाचे भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थिती. सकाळी 11 वाजता श्रीक्षेत्र जगदंबा मंदिर पोहरादेवीकडे प्रयाण, आगमन व दर्शन. सकाळी 11:30 वाजता श्री संत सेवालाल महाराज समाधीस्थळ पोहरादेवी येथे आगमन व समाधीचे दर्शन. दुपारी 12 वाजता हेलीपॅड पोहरादेवीकडे प्रयाण.दुपारी 12:10 वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या स्वागतास उपस्थिती. दुपारी 12:30 वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत नंगारा वास्तुसंग्रहालय परिसरातील सेवाध्वज ध्वजारोहण व संत सेवालाल महाराज यांच्या अश्वरूढ पुतळा अनावरण कार्यक्रमास उपस्थिती तसेच नंगारा वास्तुसंग्रहालय कामाची पाहणी व आढावा सभा. दुपारी 1 वाजता नंगारा वास्तुसंग्रहालय येथून मौजे वसंतनगरकडे प्रयाण व 593 कोटी रुपयांच्या विकासकामांच्या भूमिपूजन सोहळा व सभेला उपस्थिती. दुपारी 3 वाजता सभा संपल्यानंतर मुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्यासोबत हेलिपॅड पोहरादेवीकडे प्रयाण. दुपारी 3:25 वाजता वसंतनगर येथील सभास्थळाकडे प्रयाण व मान्यवरांच्या भेटी. दुपारी 4 वाजता नंगारा वास्तु संग्रहालयाकडे प्रयाण व मान्यवरांच्या भेटी.वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा.दुपारी 4 वाजता नंगारा वास्तु संग्रहालयाकडे प्रयाण,आगमन व राखीव आणि सोयीनुसार यवतमाळकडे प्रयाण करतील.
Comments
Post a Comment