सामाजिक न्याय भवन येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न
- Get link
- X
- Other Apps
सामाजिक
न्याय भवन येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न
वाशिम, दि. 22 (जिमाका) : सामाजिक न्याय भवन,वाशिम येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन 20 फेब्रुवारी रोजी करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त डॉ.छाया कुलाल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विजय टेकवानी,टेली लॉयर ॲड. शुभांगी खडसे,ॲड. किरण राऊत,राजकुमार पडघान,रोशनी चोपडे व किन्नर प्रतिनिधी करीना आडे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करून करण्यात आली.
डॉ.कुलाल यांनी तृतीयपंथी यांना समाजात समान दर्जा मिळायला हवा,समाजाने त्यांचा आदर करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
श्री. टेकवानी यांनी तृतीयपंथी यांना मोफत विधी सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.समाजाचा तृतीयपंथी यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे. असे सांगितले.
विश्व सामाजिक न्याय दिन या विषयावर राजकुमार पडघान,ॲड. शुभांगी खडसे यांनी लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठीचे कायदे व त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजनांवर माहिती दिली.रोशनी चोपडे यांनी तृतीय पंथीयांच्या समस्या व उपाय यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला विधी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विधी सेवा प्राधिकरणचे अधिक्षक संजय भुरे,दीपक देशमाने,गणेश गायकवाड, विवेक पाचपिल्ले,अनिल देशमुख, मोतीराम खडसे,सुशील भीमजियाणी व गणेश पंडित यांनी परिश्रम घेतले
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment