वाघोळा व दिघीत दिली कलापथकाने समाज कल्याण योजनांची माहिती
- Get link
- X
- Other Apps
वाघोळा व दिघीत दिली कलापथकाने समाज कल्याण योजनांची माहिती
वाशिम दि.२४(जिमाका) जिल्हा माहिती कार्यालय,वाशिमच्या वतीने अनुसूचित जाती उपयोजना सन २०२२-२३ अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांच्या योजनांची माहिती सूर्यलक्ष्मी संस्थेचे प्रमुख शाहीर विलास भालेराव व त्यांच्या सहकारी कलावंतांनी कलापथक कार्यक्रमांमधून कारंजा तालुक्यातील वाघोळा व दिघी येथे नुकतीच दिली.
शाहीर भालेराव व त्यांच्या कलावंतांनी ग्रामस्थांना मार्जिन मनी योजना,कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना,डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना,अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींसाठी निवासी शाळा, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती, कन्यादान योजना,आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार,अनुसूचित जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा, मुला-मुलीसाठी शासकीय वसतीगृहे, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनाचा पुरवठा करणे इत्यादी महत्त्वाच्या योजनासोबतच समाज कल्याण विभागाच्या अन्य लोककल्याणकारी योजनाची माहिती जनजागृती कलापथकाच्या सादरीकरणातून गावातील लाभार्थ्यांना दिली.
वाघोळा येथील कार्यक्रमाला सरपंच छायाताई ठोंबरे, उपसरपंच किरण खंडारे,ग्रामसेविका रेखा उंबरे,माजी सरपंच भारत भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच बहुसंख्येने नागरिक देखील उपस्थित होते.
दिघी येथील कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते सुरेश बाकल, विजय ढळे, भिमाई महिला बचतगटाच्या देवका इंगोले,सचिव इंदुबाई आढाव,गौतमी महिला बचत गटाच्या अध्यक्ष सुजाता ढळे,सचिव करुणा ढेरे,तसेच सावित्रीबाई फुले महिला बचत गट,अंबिका महिला बचत गट,शिवाजी बचत गट,जय भोले दिव्यांग पुरुष बचतगट, कामाक्षा महिला बचत गट, त्याचबरोबर भीम ज्योत मंडळ, पंचशील मंडळ व सिद्धार्थ मंडळाचे नवयुवक कार्यकर्ते, महिला,पुरुष व शालेय विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी कलापथकातील कलावंतांनी जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या समर्पण ह्या समाज कल्याणच्या निवडक योजनांची माहिती असलेल्या घडीपुस्तिकेचे वाटप कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख व्यक्तींसह लाभार्थी व ग्रामस्थांना केले.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment