24 फेब्रुवारी रोजी कामरगांव येथेस ंत्रा पिकासाठी कार्यशाळा



24 फेब्रुवारी रोजी कामरगांव येथे

संत्रा पिकासाठी कार्यशाळा

       वाशिम, दि. 22 (जिमाका) : कारंजा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,वाशिम यांच्या मार्गदर्शनात तालुका कृषी अधिकारी कारंजा व कारंजा तालुका कृषी व्यावसायीक संघाच्या वतीने संत्रा पिकासाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळा 24 फेब्रुवारी 2023 रोजी कामरगाव येथील ग्रामपंचायत भवन येथे आयोजित केली आहे. या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी करडा येथील कृषी विज्ञान केंद्राचे फळबाग तज्ञ निवृत्ती पाटील व मोर्शी येथी प्रगतशील व अनुभवी शेतकरी प्रवीण बेलखेडे हे मार्गदर्शन करणार आहे. प्रगतशील शेतकऱ्यांचे शेतावर प्रक्षेत्र भेटसुध्दा राहणार आहे. कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उप विभागीय कृषी अधिकारी निलेश ठोंबरे व तालुक्यातील सर्व प्रगतशील संत्रा उत्पादक शेतकरी हजर राहणार आहे. तरी शेतकरी बांधवांनी या कार्यशाळेचा

*******


Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित