जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वीत




जिल्हाधिकारी कार्यालयात

मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वीत

       वाशिम, दि. 06 (जिमाका) : जिल्हयातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावरील कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने यामध्ये अधिक लोकाभिमुकता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या दृष्टीने तसेच ग्रामीण भागातील नागरीकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे 18 डिसेंबर 2022 पासून मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात येऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. या कक्षाचे पदसिध्द विशेष कार्यकारी अधिकारी हे निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे तर त्यांना सहायक म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार (सं.गां.यो.) कैलास देवळे व अव्वल कारकुन मुकूंद पवार हे असतील.

          वरील अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या क्षेत्रीय कार्यालयात सर्वसामान्य जनतेकडून मुख्यमंत्र्यांना उद्देशुन लिहिलेले दैनंदिन प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ इत्यादी स्विकारण्यात येऊन त्याबाबतची पोच संबंधित अर्जदारास देण्यात येईल. ज्या अर्ज, संदर्भ व निवेदने या संदर्भात जिल्हास्तरीय सर्व कार्यालय प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन संबंधित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या दृष्टीकोणातून कार्यवाही करण्यात येणार आहे. त्याबाबतचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपूर्वी मुख्यमंत्री सचिवालयास सादर करण्यात येणार आहे. तरी जिल्हयातील नागरीकांनी या कक्षाचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश