इ. 12 वी आणि इ. 10 वीच्या परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटीसाठी भरारी पथके
- Get link
- X
- Other Apps
इ. 12 वी आणि इ. 10 वीच्या परीक्षा केंद्रांना
आकस्मिक भेटीसाठी भरारी पथके
वाशिम, दि. 21 (जिमाका) : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इ. 12 वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत जिल्हयातील 71 परीक्षा केंद्रावर होणार आहे. माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच इ. 10 वीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत जिल्हयातील 87 परीक्षा केंद्रावर होणार आहे. या परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी देण्याकरीता भरारी पथके गठीत करण्यात आली आहे. या पथकामध्ये पथक क्र. 1 मुख्य कार्यकारी अधिकारी, पथक क्र. 2 जिल्हा पोलीस अधिक्षक, पथक क्र. 3 उपविभागीय अधिकारी, वाशिम, पथक क्र. 4 उपविभागीय अधिकारी, कारंजा, पथक क्र.5 उपविभागीय अधिकारी, मंगरुळपीर, पथक क्र. 6 उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम, पथक क्र. 7 उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा, पथक क्र. 8 उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगरुळपीर, पथक क्र. 9 उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जि.प. वाशिम, पथक क्र. 10 उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग) जि. प. वाशिम आणि पथक क्र. 11 उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) जि.प. वाशिम हे या पथकांचे पथक प्रमुख असतील. संबंधित पथकांमध्ये त्यांच्या अधिनस्त असलेले वर्ग-1 किंवा वर्ग-2 चे अधिकारी आणि एक महिला प्रतिनिधींचा समावेश राहील.
भरारी पथक आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी देतील. विशेषत: संवेदनशील व उपद्रवी परीक्षा केंद्रांना प्रथम प्राधान्याने ही पथके भेटी देणार आहे. परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळल्यास ही पथके योग्य ती कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमुद केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment