समभाव ’ घडीपुस्तिकेचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते विमोचन
- Get link
- X
- Other Apps
‘ समभाव ’ घडीपुस्तिकेचे
जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते विमोचन
वाशिम, दि. 08 (जिमाका) : सर्वसाधारण घटकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांना व्हावी, यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2022-23 या वर्षात तयार केलेल्या ‘समभाव’ या घडीपुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते आज 8 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहात करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण यांच्यासह विविध यंत्रणेच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
‘समभाव’ या सर्वसाधारण योजनेवरील घडीपुस्तिकेत कृषि यांत्रिकीकरण, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, माझी कन्या भाग्यश्री, मच्छीमार सहकारी संस्थांना अर्थसहाय्य, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, जननी शिशू सुरक्षा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, मनोधैर्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, शुभमंगल सामुहिक विवाह योजना व प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियान आदी योजनांची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची माहिती देखील या घडीपुस्तिकेत देण्यात आली.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment