गोटे महाविद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

गोटे महाविद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न 

वाशिम,दि.४ (जिमाका)  जिल्हा विधि सेवा प्राधिकरण व राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या संयुक्त वतीने ४ फेब्रुवारी रोजी गोटे महाविद्यालयाच्या सभागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. या कार्यक्रमाची
सुरवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. प्रास्ताविक रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.विकास चांदजकर यांनी केले.यावेळी अॅड. शुभांगी खडसे यांनी " क्लेम ट्रिब्युनल
ॲग्रीड प्रोसीजर " या विषयावर, जिल्हा पोलीस दलातील सायबर विभागाचे दिपक घुगे यांनी
" सायबर काईम " विषयावर, विधि स्वयंसेवक सुशिल भिमजियाणी यांनी नालसा दिव्यांग बालकांची योजना २०२१ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य जी. एस. कुबडे यांनी अशा कार्यक्रमाच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत असल्याचे सांगितले.         ‌‌ 
       जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही.ए.टेकवाणी यांनी विद्यार्थ्यांशी  संवाद साधला. जनजागृती कार्यक्रम राबवुन विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जनजागृती केली पाहिजे असे सांगीतले.करियर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी कायद्याचे शिक्षण घेवुन विधि क्षेत्रात कार्य करावे असे 
आवाहन त्यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे संचालन अंजली वानखेडे यांनी तर आभार मानवी वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना पथकातील विद्यार्थी, विधि स्वयंसेवक,अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. 
       कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विकास चांदजकर,संजय गोटे,विवेक पाचपिल्ले,विधि स्वयंसेवक मोतीराम खडसे,उषा वानखेडे व इतर विधि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश