मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त कायदेविषयक शिबिर संपन्न
मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त
कायदेविषयक शिबिर संपन्न
वाशिम, दि. 27 (जिमाका) मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त आज 27 फेब्रुवारी रोजी विदाता भवन,वाशिम येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विजय टेकवानी होते.यावेळी प्रफुल्ल इटाल,टेली लॉयर ॲड.शुभांगी खडसे,जगदीश मानवतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. टेकवानी यांनी कायदेविषयक शिबिरातून प्रत्येकाने ज्ञान घेऊन इतरांना सुध्दा जागरुक करावे, माहिती अधिकाराचा सदुपयोग होणे गरजेचे आहे.कायदा हा चांगल्या उद्देशाने बनतो.त्याचा फक्त चांगलाच वापर व्हायला हवा. राज्यघटनेत नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचे उल्लेख असून त्याचे पालन सर्वांनी करावे असे सांगितले.
ॲड. शुभांगी खडसे यांनी महाराष्ट्र राज्य नागरी सेवा हक्क कायदा 2015 विषयी आणि जगदिश मानवतकर यांनी माहिती अधिकार कायदा 2005 या विषयावर मार्गदर्शन केले. संचालन आणि आभार विधी स्वयंसेवक राजकुमार पडघान यांनी मानले.यशस्वीतेसाठी विधी सेवा प्राधिकरणचे अधिक्षक संजय भुरे, गणेश गायकवाड,दीपक देशमाने, विवेक पाचपिल्ले,अनिल देशमुख, विधी स्वयंसेवक सुशील भिमजियाणी, मोतीराम खडसे,गणेश पंडित व उमेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
*******
Comments
Post a Comment