शासकीय तंत्रनिकेतन येथे रक्तदान शिबिर संपन्न
- Get link
- X
- Other Apps
शासकीय तंत्रनिकेतन येथे रक्तदान शिबिर संपन्न
वाशिम, दि. 20 (जिमाका) : शासकीय तंत्रनिकेतन वाशिम येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व शिवजयंती निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत व जलसंपदा विभाग, वाशीम यांच्या संयुक्त वतीने १९ फेब्रुवारी रोजी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी, वाशीम यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये सामाजिक जाणीवेतून एकूण ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये जलसंपदा विभागाचे व संस्थेमधील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
रक्तदान शिबिराच्या उदघाटनाला संस्थेचे प्राचार्य डॉ.बी.जी. गवलवाड, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक, प्रमोद मादाडे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ए.एल. पाठक, विभाग प्रमुख ए.डी.ढोले, एनएसएस समन्वयक यु. ए.नागे, बी.बी. लव्हाळे, डॉ. आर. बिलोलीकर, व्ही. एस जोशी, जिल्हा सामान्य रुग्णालयातील चमू व संस्थेतील विद्यार्थी उपस्थित होते.
प्राचार्य श्री. गवलवाड म्हणाले, आपण स्वतः रक्तदान केल्यामुळे कुणाचा तरी जीव वाचवू शकतो. त्यामुळे रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे. प्रमोद मादाडे व श्री. ए.एल. पाठक यांनी रक्तदानामुळे होणारे फायदे व महत्व सांगितले. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, एनएसएस समन्वयक, जलसंपदा विभाग, विभाग प्रमुख, अधिकारी- कर्मचारी, एनएसएस स्वयंसेवक व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment