1 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश



1 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

       वाशिम, दि. 17 (जिमाका) : जिल्हयात 19 फेब्रुवारीपर्यंत मंगरुळपीर येथे बिरबलनाथ महाराज यांची यात्रा आहे. 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सव व 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव जिल्हयात साजरा करण्यात येणार आहे. सद्यास्थितीत जिल्हयात विविध पक्ष/संघटना/ सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून वेगवेगळया मागण्याकरीता धरणे/आंदोलने/उपोषणे करण्यात येत आहे. मागील काही दिवसात जिल्हयात घडलेल्या जातीय घटनेच्या अनुषंगाने निषेधात्मक आंदोलने, बंद व मोर्चाचे विविध राजकीय व धार्मिक संघटनांकडून आयोजन करण्यात येत आहे. जिल्हा सण-उत्सवाच्या व राजकीय दृष्टिने संवेदनशील आहे. सण उत्सवाच्या काळात जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे सोयीचे व्हावे, यासाठी 15 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी लागू केले आहे. हे आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय/निमशासकीय अधिकारी- कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास लागू राहणार नाही.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश