किमान कौशल्य विकास कार्यक्रम प्रशिक्षणासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव आमंत्रित



किमान कौशल्य विकास कार्यक्रम

प्रशिक्षणासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव आमंत्रित

       वाशिम, दि. 22 (जिमाका) : कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागातंर्गत जिल्हयातील युवक-युवर्तीचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करुन त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियान राबविण्यात येते.जिल्हयातील विशिष्ट भौगोलिक तथा सामाजिक स्थिती, परंपरागत व्यवसाय, नैसर्गिक संसाधने तथा साधनसामुग्री इत्यादींच्या आधारे जिल्हयातील रोजगार/स्वयंरोजगारासाठी अधिक मागणी असलेली क्षेत्रे निश्चित करुन त्यानूसार कौशल्य विकास प्रशिक्षण (अभ्यासक्रम) राबविण्यासाठी किमान कौशल्य विकास कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येते.

          सन २०२२-२३ मध्ये किमान कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत जिल्हयातील रोजगार/स्वयंरोजगार इच्छूक उमेदवारांना वैविध्यपूर्ण व नाविन्यपूर्ण जॉबरोल्समध्ये (अभ्यासक्रम) प्रशिक्षण उपलब्ध होण्यासाठी ज्या प्रशिक्षण संस्था स्किल इंडीया पोर्टलवर सूचिबध्द आहेत. जिल्हयात गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देणाऱ्या इतरही प्रशिक्षण संस्थांनी किमान कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत निश्चित केलेल्या पुढील नमूद अभ्यासक्रमात (जॉबरोल्स) प्रशिक्षण देण्यासाठी प्रस्ताव सादर करावे.

          जिल्हयात प्रशिक्षण देण्यासाठी उपलब्ध अभ्यासक्रमांचे (जॉबरोल्स) नावे पुढील प्रमाणे आहे.टु-व्हीलर सर्व्हिस टेक्नीशियन, कमर्शियल व्हेविकल ड्रायव्हर,एल.ई.डी.लाईट रिपेअर टेक्नीशियन, डि.टि.एच.सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन अॅण्ड सर्व्हिस टेक्नीशियन, ड्रोन सर्व्हिस टेक्नीशियन, ग्रेन मिल ऑपरेटर, डेअरी प्रोडक्टस प्रोसेसर, बेकींग टेक्नीशियन/ ऑपरेटर, सोलर पि.व्ही. इन्स्टॉलर (सुर्यमित्र), सोलर पॅनल इंस्टॉलेशन टेक्नीशियन, पेशंट रिलेशन्स असोसिएट, हॉस्पीटल फ्रंट डेस्क को-ऑर्डीनेटर, अकाऊंट एक्झेकेटिव्ह व कीचन हेल्पर इत्यादीवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

          जिल्हयातील प्रशिक्षण संस्था प्रमुखांनी २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. त्याआधारे प्राप्त प्रस्तावातून जिल्हास्तरीय कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती, वाशिम यांच्या शिफारशीनूसार गुणवत्तापूर्ण व दर्जेदार प्रशिक्षण संस्थांना या विभागाच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनास अनुसरुन नोंदणी करण्याबाबत कळविण्यात येईल. त्यानंतर सूचिबध्द होणाऱ्या प्रशिक्षण संस्थांना किमान कौशल्य विकास कार्यक्रम या योजनेंतर्गत जिल्हयात कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण तुकडया देण्याविषयी उचित कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश