येडशीत दिली कलापथकानेसमाज कल्याण योजनांची माहि
- Get link
- X
- Other Apps
येडशीत दिली कलापथकाने
समाज कल्याण योजनांची माहिती
वाशिम, दि. 14 (जिमाका) : मंगरुळपीर तालुक्यातील येडशी येथे समाज कल्याण विभागाच्या निवडक महत्वूपर्ण योजनांची माहिती 13 फेब्रुवारी रोजी जिल्हा माहिती कार्यालय, वाशिम अंतर्गत आयोजित महात्मा ज्योतीबा फुले शिक्षण बहुउद्देशीय संस्था, उमरा (शम.) च्या कलापथकाने ग्रामस्थांचे मनोरंजन करुन प्रबोधनातून दिली. कलापथकाचे प्रमुख शाहीर संतोष खडसे व त्यांच्या सह कलावंतांनी समाज कल्याण विभागाच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, मार्जिन मनी योजना, छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार यासह अन्य योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली. यावेळी सरपंच आशादेवी चक्रनारायण, सहदेव चक्रनारायण, ग्रा.पं. सदस्य किसन खटाळ, अश्विनी चक्रनारायण, सचिन चक्रनारायण, सतिष सावळे, अंबादास चक्रनारायण, सुरेश महाजन, बबन चक्रनारायण, गजानन चक्रनारायण, मनोज हमरे, माजी पोलीस पाटील महादेव चक्रनारायण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment