उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले देवी जगदंबा,संत सेवालाल महाराज व संत रामराव महाराजांच्या समाधीचे दर्शन


उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले देवी जगदंबा,संत सेवालाल महाराज व संत रामराव महाराजांच्या समाधीचे दर्शन 

वाशीम दि.१२(जिमाका) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज मुख्यमंत्र्यांसमवेत हेलिकॉप्टरने पोहरादेवी येथे आगमन झाल्यावर त्यांनी माता जगदंबा देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.तसेच संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री संजय राठोड,ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन,बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे,आमदार राजेंद्र पाटणी, आमदार ऍड.निलय नाईक,बंजारा समाजाचे धर्मगुरु महंत बाबूसिंग महाराज,महंत कबिरदास महाराज, शेखर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर