वाशिम-हिंगोली मार्गावरील रेल्वे ट्रॅक दूरुस्ती वाहतूकीकरीता पर्यायी मार्गाची व्यवस्था



वाशिम-हिंगोली मार्गावरील रेल्वे ट्रॅक दूरुस्ती

वाहतूकीकरीता पर्यायी मार्गाची व्यवस्था

       वाशिम, दि. 21 (जिमाका) : वाशिम- हिंगोली रोडवरील क्रॉसींग गेट क्र. 115 वरील रेल्वे ट्रॅकचा काही भाग खराब झाल्यामुळे रेल्वे ट्रॅकवरुन रेल्वे आणि इतर वाहने सुरळीत ये-जा करण्यासाठी त्याची दुरुस्ती करण्यात येणार असल्यामुळे या ट्रॅकवरील वाहतूक 23 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजतापासून ते 24 फेब्रुवारी 2023 पर्यंतच्या सकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 6 तासाकरीता वाशिम-हिंगोली रोड पुर्णपणे बंद राहणार आहे.

          वाशिम-हिंगोली रोडवरील क्रॉसींग गेट क्र. 115 वरील रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती ट्रॉफीक सुरु असतांना करणे शक्य नसल्याने, वाशिम-हिंगोली रोडवरील वाहतूक पुर्णपणे बंद करुन पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (ख) नुसार 23 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजतापासून ते 24 फेब्रुवारी 2023 पर्यंतच्या सकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 6 तासाकरीता पुढीलप्रमाणे वाशिम-हिंगोली मार्गावरील वाहतूक प्रस्तावित मार्गावर वाहतूक वळविण्याबाबत आदेश जारी केले आहे.

          वाशिमकडून हिंगोलीकडे जाणारी सर्व वाहतूकीकरीता पर्यायी मार्ग वाशिमवरुन हिंगोली जाण्याकरीता रिसोड-सेनगांव-नर्सी टी पॉईंट मार्गे- हिंगोलीकडे, अकोला, बाळापूर व पातुरकडून हिंगोलीकडे जाणारी वाहतूक मालेगांव-वाशिम-रिसोड-सेनगांव-नर्सी टी पॉईंट मागे हिंगोलीकडे, किंवा मालेगांव-शिरपूर-रिसोड-सेनगांव-नर्सी टी पॉईंट- मार्गे हिंगोलीकडे आणि अमरावतीकडून हिंगोली जाण्याकरीता कारंजा-मंगरुळपीर-वाशिम-रिसोड-सेनगांव-नर्सी टी पॉईंट मार्गे हिंगोलीकडे जातील. असे या आदेशात नमुद केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश