ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उमरी व पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकासकामांचे भूमिपूजन*




*ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उमरी व पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकासकामांचे भूमिपूजन*


          वाशिम, दि.१२ : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील उमरी व पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील ३२६.२४ कोटी रुपयांच्या विकासकामांचे कोनशिलेचे अनावरण करून भूमिपूजन आज करण्यात आले.

यावेळी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, निलय नाईक, जिल्हाधिकारी षन्मुखराजन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांचे बंजारा नृत्य सादर करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे औक्षण व सामकी मातेचे दर्शन घेण्यात आले.

          0000
          

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश