नागरीकांच्या प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढा षण्मुगराजन एस.
- Get link
- X
- Other Apps
नागरीकांच्या प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढा
वाशिम, दि. 14 (जिमाका) : विविध यंत्रणांकडे आणि तालुकास्तरावर तहसिल कार्यालयाकडे समाधान शिबीराच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या नागरीकांच्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यात याव्यात. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात 13 फेब्रुवारी रेाजी समाधान शिबीर आयोजनाच्या निमित्ताने आयोजित सभेत श्री. षण्मुगराजन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण, सुहासिनी गोणेवार, मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, जिल्हा उपनिबंधक डी.पी. राठोड, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक दिनेश बारापात्रे, जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण मापारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. षण्मुगराजन म्हणाले, नागरीकांच्या तालुकास्तरावर आलेल्या तक्रारींना गुणवत्तापूर्ण उत्तर दयावे. मोघम उत्तर देवू नये. तक्रारदारांचे उत्तरातून समाधान झाले पाहिजे. तक्रारदाराला संबंधित उत्तर मिळाल्याची खात्री संबंधित विभागाने करावी. तालुकास्तरीय यंत्रणांच्या विभाग प्रमुखांनी तो अहवाल वेळीच तहसिलदारांकडे पाठवावा. प्रत्येक विभागाने आपल्याकडे प्राप्त तक्रारीची नोंद घेण्यासाठी स्वतंत्र नोंदवही ठेवावी. तक्रारदाराच्या अर्जावर केलेल्या कार्यवाहीची माहिती अर्जदाराला मिळाल्याची खात्री करावी. तहसिलदारांनी त्यांच्याकडे प्राप्त सर्व तक्रारी शुक्रवारपर्यंत निकाली काढाव्यात. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडे येणाऱ्या तक्रारी 7 दिवसाच्या आत निकाली काढाव्यात. तसेच सीपी पोर्टल व पीएमजी पोर्टलवर आणि आपले सरकार पोर्टलवर येणाऱ्या तक्रारी देखील निर्धारीत वेळेत निकाली काढण्याचे निर्देश श्री. षण्मुगराजन यांनी यावेळी दिले.
उपस्थित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी, तहसिलदार, गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांनी त्यांच्याकडे प्राप्त तक्रारीवर केलेली कार्यवाहीबाबतची माहिती यावेळी दिली.
सभेला वाशिम तहसिलदार विजय साळवे, रिसोड तहसिलदार अजीत शेलार, मालेगांव तहसिलदार रवि काळे, मंगरुळपीर प्रभारी तहसिलदार रवि राठोड, कारंजाचे तहसिलदार धीरज मांजरे, मानोरा तहसिलदार ज्ञानेश्वर घ्यार, कारंजा व मंगरुळपीरचे गटविकास अधिकारी श्री. पडघन, वाशिम व मानोराचे गटविकास अधिकारी श्री. बयास, वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ, कारंजाचे मुख्याधिकारी दिपक मोरे, रिसोड मुख्याधिकारी निलेश गायकवाड, मालेगांव मुख्याधिकारी श्री. सोनवणे, भूमि अभिलेख विभागाचे श्री. पट्टेबहादूर यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment