28 फेब्रुवारीला मानोरा येथे रोजगार मेळावा



28 फेब्रुवारीला मानोरा येथे रोजगार मेळावा

       वाशिम, दि. 22 (जिमाका) : राज्यातील नामांकित नियोक्त्यांकडून प्राप्त मनुष्यबळ मागणीनुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केन्द्र, वाशिम कार्यालयाकडुन पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा २८ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.ज्या उमेदवारांना प्रत्यक्ष रोजगार मेळयाव्याला उपस्थित राहून त्यांनी ऑफलाईन रोजगार मेळाव्याला २८ फेब्रुवारी रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था,मानोरा येथे उपस्थित रहावे.या रोजगार मेळाव्यात जिल्हयासह राज्यातील औरंगाबाद येथील परम स्किल्स ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,अमरावती येथील पिपल ट्री व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एल.आय.सी.ऑफ इंडिया शाखा वाशिम येथील नामांकित आस्थापना/कंपन्यांमध्ये १०० रिक्त जागेवर रोजगार मिळविण्याची संधी जिल्हयातील नोकरी इच्छुक उमेदवारांना याद्वारे प्राप्त होणार आहे.

           जिल्हयातील रोजगार इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवारांना www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी होता येणार आहे.या रोजगार मेळाव्यात इ. १० वी इ. १२ वी, स्थापत्य पदविका, कृषि दविका, आयटीआय सर्व ट्रेड, इतर सर्वशाखीय पदवीधर असणाऱ्या रोजगार इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवारांना त्यांच्याकडील सेवायोजन कार्डच्या युझरनेम व पासवर्ड मधून मेळाव्यात सहभागी होता येईल. त्यानुसार सहभागी झालेल्या उमेदवारांना उद्योजकांकडून ऑफलाईन पध्दतीने मुलाखत घेवून निवड करण्यात येणार आहे. तरी जिल्हयातील रोजगार इच्छुक स्त्री/पुरुष उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याकरीता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मानोरा येथे उपस्थित रहावे.

           रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होण्यासाठी www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील Job Seeker वरील Forth Comming Pandit Dindayal Upadhyay Job Fairs या खाली View All वर क्लिक करून washim जिल्हा सिलेक्ट करुन सर्च करावे. नंतर पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा या नावाने रोजगार मेळावा दिसेल. त्यासमोरील View More वर क्लिक करुन View Vacancies वर क्लिक करावे. त्यानंतर पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यामधील रिक्त पदे दिसतील. त्या समोर APPLY करावे त्यानंतर (Please login or register to apply the Jobfair vacancies other than Aurangabad District Jobfair, Please close the next Pop up and then Login or Register) असा मॅसेज दिसेल. त्यानंतर OK करुन आपल्याकडील युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करावा. या पध्दतीने आपण या ऑनलाईन मेळाव्यात सहभागी झालेले असाल. काही अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम यांच्या ०७२५२-२३१४९४ या दुरध्वनी क्रमांक किंवा ९८५०९८३३५/ ८६६८२५६५००/ ७८७५७९८६८४ या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा.असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश