बालकांचे कायदेविषयक कार्यशाळा संपन्न
- Get link
- X
- Other Apps
बालकांचे कायदेविषयक कार्यशाळा संपन्न
वाशिम, दि. 15 (जिमाका) : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, वाशिम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था, तोंडगाव यांच्या संयुक्त वतीने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग यांच्या निर्देशाप्रमाणे अक्षय तृतीया या दिनी होणारे बालविवाह थांबविण्याबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बालासाहेब सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात बालस्नेही वातावरण निर्मितीकरीता सर्व तालुक्यांमधे बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम) २०१५, बालकाचे लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम 2012, बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६, या विषयावर जिल्ह्यातील ग्रामसेवक, मुख्याध्यापक, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गटाच्या महिला यांचे नुकतेच प्रशिक्षण घेण्यात आले.
कायदा तथा परीविक्षा अधिकारी जिनसाजी चौधरी, संरक्षण अधिकारी भगवान ढोले, सामाजिक कार्यकर्ता अनंता इंगळे, राजामती ढोले यांनी बालस्नेही वातावरण निर्मिती आणि गाव बाल संरक्षण समिती सक्रीय होण्याकरीता प्रत्येक गावांमध्ये बाल पंचायत निर्माण करणे, बालविवाह मुक्त जिल्हा होण्यासाठी व बालकांचे हक्क अबाधित राहण्याकरिता कायदेविषयक मार्गदर्शन केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी यशदा, पुणेच्या लीना तुर्क, प्रवीण पट्टेबहादुर, अश्विनी अवताडे, राजकुमार पडघाण व प्रभु कांबळे यांचे सहकार्य लाभले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment