मुर्तीजापूर येथे कलापथकाने केला समाज कल्याण योजनांचा जागर



मुर्तीजापूर येथे कलापथकाने केला

समाज कल्याण योजनांचा जागर

       वाशिम, दि. 15 (जिमाका) : समाज कल्याण विभागाच्या महत्वपूर्ण योजनांची माहिती लाभार्थ्यांना व्हावी, यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, वाशिमच्या वतीने कलापथकाचे कार्यक्रम जिल्हयात सुरु आहे. मंगरुळपीर जवळील ग्रामपंचायत मंगळसा अंतर्गत येणाऱ्या मुर्तीजापूर येथील पंचशिल नगरातील बुध्द विहारात 14 फेब्रुवारी रोजी महात्मा ज्योतीबा फुले बहुउद्देशीय संस्था, उमरा (शम.) चे अध्यक्ष शाहीर संतोष खडसे आणि त्यांच्या सह कलावंतांनी कलापथकाच्या माध्यमातून समाज कल्याण योजनांचा जागर मांडून माहिती दिली. यावेळी कलापथकाने उपस्थितांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना, मार्जिन मनी योजना, स्वाधार योजना, कृषी स्वावलंबन योजना, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना, शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती पुरस्कार, निवासी शाळा व वसतीगृहे योजना यासह अन्य योजनांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी ग्रा.पं. सदस्य ममता अंभोरे, रामकृष्ण डेरे, विनोद डेरे, माजी ग्रा.पं. सदस्य कुसूम मनवर, पोलीस पाटील विनोद मनवर, बाबाराव भगत, अनिता भगत, महादेवराव अंभोरे, पंजाबराव अघम, रुपराव इंगोले, आनंदराव अघमे तसेच महिला मंडळाच्या सदस्य मोठया संख्येने उपस्थित होत्या.   

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे