म्हसोला येथे कलावंतांनी दिली समाज कल्याण योजनांची माहिती



म्हसोला येथे कलावंतांनी दिली

समाज कल्याण योजनांची माहिती

       वाशिम, दि. 17 (जिमाका) : मंगरुळपीर तालुक्यातील म्हसोला या गावी 16 फेब्रुवारी रोजी महात्मा फुले बहु. संस्थेच्या कलापथकाने गावातील लाभार्थ्यांना व ग्रामस्थांना समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांचे प्रबोधन करुन दिली. कलापथक प्रमुख शाहिर संतोष खडसे यांनी व त्यांच्या सहकारी कलावंतांनी ग्रामस्थांना मार्जिन मनी योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कन्यादान योजना, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा, मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृह योजना, शेळी गट वाटप योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा करणे, अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींसाठी निवासी शाळा, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना या निवडक व महत्वपूर्ण योजनांची माहिती देण्यात आली.

        कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठीत नागरीक काशिराम खडसे, निरंजन खडसे, बापुराव दोडके, रामचंद्र खडसे, अशोक काजळे, महिपाल धवणे, शिध्दोधन खडसे, रामकृष्ण खडसे, रामा राठोड, रामेश्वर जाधव, गंगाराम आडे, सिध्दार्थ खडसे, बापुराव कांबळे, विशाल खडसे, किसन खडसे, यशवंत खडसे, रतन पवार, रामू राठोड, अजय भगत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कलापथक कार्यक्रमाला गावातील बचत गटातील महिला व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश