श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिपॅडवर आगमन
- Get link
- X
- Other Apps
श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिपॅडवर आगमन
वाशिम दि.१२(जिमाका) कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे मुख्य तीर्थक्षेत्र असलेल्या मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे उमरी व पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत विविध विकासकामांचे भूमीपूजन,संत सेवालाल महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे व सेवाध्वजाचे अनावरण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज हेलिकॉप्टरने पोहरादेवी येथे मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या हेलिपॅडवर आगमन झाले.
आगमनप्रसंगी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांचे पालकमंत्री संजय राठोड यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, आमदार राजेंद्र पाटणी,आमदार ऍड.निलय नाईक,विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे,अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वसंत नाईकनवरे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत व पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment