Posts

Showing posts from March, 2020

कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये जीवनावश्यक शेतमालाची खरेदी-विक्री सुरु करण्याचे आदेश

Image
·         ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना वाशिम ,   दि. ३० : ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्या ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या आदेशात बदल करून कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी गर्दी कमी करणे, आवश्यक खबरदारी घेण्याच्या अटींवर जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समितींमध्ये जीवनावश्यक शेतमालाच्या खरेदी-विक्री व्यवहार सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत.   कोरोना संदर्भात जनजागृती होण्यासाठी बाजार समिती कार्यक्षेत्रातील बाजार व उपबाजार क्षेत्रातील परिसरात लोकांना कोरोना विषाणूपासून काळजी घेण्याबाबत फलक लावून अथवा उद्घोषणाद्वारे आवाहन करावे व आवश्यक माहिती द्यावी. बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना कोरोना विषयक जनजागृती करणाऱ्या माहितीपत्रकांचे वाटप करावे. बाजार आवारात सार्वजनिक स्वच्छता ठेवण्याकडे संपूर्णपणे लक्ष देण्यात यावे. बाजार संपल्यानंतर तसेच रात्रीच्या वेळी बाजार आव

डाक विभागामार्फत नागरिकांसाठी राष्ट्रीयकृत बँकेतून रक्कम काढण्याची घरपोच सुविधा

Image
·         सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत नाव नोंदवा वाशिम ,   दि. ३० : ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी घरातच राहणे आवश्यक आहे. त्यामुळे या काळात वाशिम व अकोला जिल्ह्यातील नागरिकांना राष्ट्रीयकृत बँक खात्यातून १० हजार रुपये पर्यंत रक्कम घरबसल्या काढण्याची सुविधा डाक विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात डाक विभागामार्फत जनतेला बचत बँक सुविधा, टपाल वाटप, रजिस्टर बुकिंग, स्पीड पोस्ट बुकिंग या सुविधांसोबतच राष्ट्रीयकृत बँक खात्यातून १० हजार रुपयेपर्यंत रक्कम काढून पोस्टमनमार्फत अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणाऱ्या नागरिकांना आपल्या खात्यातून घरबसल्या रक्कम काढावयाची असल्यास त्यांनी अकोला डाक विभागाचे प्रवर अधीक्षक यांच्या कार्यालयातील ०७२४-२४१५०३९ या क्रमांकावर सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक व आवश्यक असलेल्या र

मालेगाव तालुक्यातील कृषि सेवा केंद्र आठवड्यातून तीन दिवस राहणर सुरु

·          सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत कालावधी निश्चित वाशिम ,   दि. ३० : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांकडून बियाणे, खते व कीटकनाशकांची मागणी होण्याची शक्यता लक्षात घेवून मालेगाव तालुक्यातील सर्व कृषि सेवा केंद्र प्रत्येक आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश तहसीलदार रवि काळे यांनी दिले आहेत. बियाणे, खते यांचा समावेश जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मध्ये असल्याने या वस्तूंची विक्री करणारी दुकाने सुरु ठेवण्याबाबत नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत. त्यानुसार मालेगाव तालुक्यातील कृषि सेवा केंद्रांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. आठवड्यातील तीन दिवस विहित कालावधीत कृषि सेवा केंद्र सुरु असताना शेतकऱ्यांना उभा राहण्यासाठी दोन मीटर अंतरावर एक याप्रमाणे निशाणी आखावी. दुकानात गर्दी होवू नये, याची दक्षता घ्यावी. तसेच शेतकऱ्यांना हात धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था व हात निर्जंतुक करण्या

वाशिम जिल्ह्यात प्रवेश बंदी; जिल्ह्यातून बाहेर जाण्यास सुध्दा मनाई - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
·         जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय ·         जिल्हा सीमा बंदीची कडक अंमलबजावणी होणार ·         बाहेरील जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांची काळजी घेणार वाशिम ,   दि. २८ :   जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही संशयित अथवा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. बाहेर जिल्ह्यातून अथवा राज्यातून येणाऱ्या व्यक्तींमुळे या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेशापर्यंत कोणत्याही व्यक्तीला जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जे नागरिक इतर जिल्ह्यात आहेत, त्यांना तिथेच राहण्याची सूचना नातेवाईकांनी करावी. बाहेर जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था तिथल्या जिल्हा प्रशासनामार्फत करण्याबाबत पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. या विषाणूचा संसर्ग झालेले लोक आपल्या जिल्ह्यात येवून येथील नागरिकांना त्याचा संसर्ग ह

जीवनावश्यक वस्तूंची विक्री आता सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच सुरु राहणार

Image
·         गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना ·         अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा वाशिम ,   दि. २८ :   जिल्ह्यात संचारबंदी काळात जीवनावश्यक वस्तूंची विक्री २४ तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, अजूनही अनेक ठिकाणी गर्दी होताना दिसत असून संचारबंदीची अंमलबजावणी करण्यामध्ये पोलिसांना अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात २९ मार्च २०२० पासून पुन्हा सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरु ठेवण्यात येणार आहे. दुपारी ३ नंतर दवाखाने, औषधी विक्री केंद्र वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना, पेट्रोलपंप बंद ठेवण्यात येतील, असे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करूनही अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. किराणा माल खरेदी, मेडिकलला जाण्याच्या बहाण्याने अनेकजण शहरात फिरताना दिसत असून त्यामुळे पोलीस यंत्रणेवर ताण येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेता लोकांची गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अन्नधान्य , किराणा , दूध , ब्रेड , फळे , भाजीपाला , अंडी , मांस , मा

बियाणे, खते विक्री करणारी दुकाने सुरु ठेवण्यासाठी नियोजन करा

Image
·         जिल्हाधिकाऱ्यांचे तहसीलदारांना आदेश वाशिम ,   दि. २७ :   कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये २५ मार्च २०२० पासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व खासगी व्यवसाय व आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, बियाणे व खते या कृषि निविष्ठांचा जीवनावश्यक वस्तू १९५५ अंतर्गत समावेश होतो. तथापि, स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांकडून बियाणे, खते व औषधांची मागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संचारबंदी काळात आवश्यकतेनुसार बियाणे, खते व औषधे विक्री करणारी दुकाने सुरु ठेवण्याबाबत नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून बियाणे, खते व औषधांची मागणी होण्याची शक्यता असल्याने सर्व तहसिलदारांनी संबंधित तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी व पंचायत समितीचे कृषि अधिकारी यांच्याशी चर्चा करून संभाव्य निविष्ठा मागणी लक्षात घेवून बियाणे व खते दुकाने आवश्यकतेनुसदार सुरु ठेवण्याबाबत नियोजन करावे. या नियोजनाबाबत संबंधित निविष्ठा विक्री सेवा केंद्रास दुकाने चालू ठेवण्याबाबत कळवावे. आवश्यक

संचारबंदीत कृषि निविष्ठा वाहतुकीला मुभा

Image
वाशिम ,   दि. २७ :   कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये २५ मार्च २०२० पासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व खासगी व्यवसाय व आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, बियाणे व खते या कृषि निविष्ठांचा जीवनावश्यक वस्तू १९५५ अंतर्गत समावेश असल्याने संचारबंदी दरम्यान या वस्तूंच्या वाहतुकीला मुभा देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. राज्यात येत्या खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे इतर राज्यात निर्मिती होवून प्रक्रिया व विक्रीसाठी राज्यात येण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. यामध्ये खंड पडू नये, म्हणून वाशिम जिल्ह्यातील निमशासकीय, शेतकरी उत्पादक कंपनी, खासगी कंपनीचे बीज प्रक्रिया केंद्र, बियाणे पॅकिंग, हाताळणी केंद्र, जिल्हांतर्गत, राज्यांतर्गत व परराज्यातून निविष्ठांची वाहतूक सुरु ठेवण्यास कृषि आयुक्ती यांनी दिली असल्याने संचारबंदीतून या बाबींच्या वाहतुकीस मुभा देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. *****

जिल्ह्यातील खासगी दवाखाने सुरु ठेवण्याचा ‘आय.एम.ए.’, ‘निमा’ संघटनेचा निर्णय

·          जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद वाशिम ,   दि. २७ :   जिल्ह्यातील खासगी दवाखाने बंद असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून सद्यस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने नियमितपणे सुरु ठेवावेत , असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी २६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आय.एम.ए., निमा व आय.डी.ए. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत केले. या आवाहनला प्रतिसाद देत जिल्ह्यातील आय.एम.ए., निमा व आय.डी.ए. संघटनेशी संबंधित सर्व डॉक्टरांचे दवाखाने सुरु ठेवण्याचा निर्णय तिन्ही संघटनानी घेतला आहे. तिन्ही संघटनांनी संयुक्त पत्रक काढून सर्व डॉक्टरांनी वैयक्तिक संरक्षणासह गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून गरजू रुग्णांची गैरसोय टाळता येईल, असे पत्रकात नमूद केले आहे. आय.एम.ए., निमा आणि आय.डी.ए. संघटनेने खासगी दवाखाने सुरु ठेवण्याबाबत घेतलेल्या निर्णयाची त्यांच्या सर्व सदस्य डॉक्टरांनी अंमलबजावणी करून आपले दवाखाने सुरु ठेवावेत. या अनुषंगाने जिल्हा प्रशासन

जीवनावश्यक वस्तूंची विक्री २४ तास सुरु ठेवण्यास मुभा

·          सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक वाशिम ,   दि. २७ :   संचारबंदी काळात जीवनावश्यक वस्तूंची विक्री २४ तास सुरु ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २६ मार्च रोजीच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने, आस्थापना २४ तास सुरु राहू शकतील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. मटन, चिकन, मासे विक्री करणारी दुकाने सुध्दा आहे त्या ठिकाणी स्वच्छता व आवश्यक खबरदारी घेवून सुरु ठेवता येतील. सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, मटन, चिकन व मासे विक्री करणाऱ्या दुकानदारांनी स्वखर्चाने ग्राहकांना उभे राहण्यासाठी चुन्याच्या सहाय्याने किमान तीन मीटरचे अंतर ठेवून मार्किंग करून सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल, याची खात्री करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. *****

उपविभागीय अधिकारी, तहसीलदार इन्सिडेंट कमांडर म्हणून घोषित

Image
·           संचारबंदी आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करणार ·         अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी वाशिम ,   दि. २७ :   संचारबंदी काळात अत्यावशक सेवा सुरळीतपणे सुरु ठेवणे, तसेच संचारबंदी आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना त्यांच्या कार्यक्षेत्राचे इन्सिडेंट कमांडर म्हणून घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी निर्गमित केले आहेत. ‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ मधील तरतुदींची व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील सर्व सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार संबंधित क्षेत्राचे इन्सिडेंट कमांडर म्हणून काम पाहतील. त्यांना संबंधित कार्यक्षेत्रामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ ची प्रभावी अंमलबजावणी होते किंवा नाही, हे तपासणे तसेच पोलीस विभाग व इतर कार्यकारी यंत्रणेच्या मदतीने प्रभावी अंमलबजावणी करून घेण्याबाबत अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा ह्या सुरळीतपणे

सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश

Image
·           औषधी दुकाने, लॅब यांनाही आदेश लागू ·         आदेशाचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई वाशिम ,   दि. २७ :   जिल्ह्यातील खासगी दवाखाने बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून त्यांना आजारांवर उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. कोरोन विषाणू संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत लोकांना त्यांच्या आजारावर उपचार मिळणे व त्यांचा आत्मविश्वास कायम राहणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी आपले दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. औषधी विक्री केंद्र, प्रयोगशाळा (लॅब) यांनाही हे आदेश लागू राहणार आहेत. कोरोना विषाणू संसर्गामुळे आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्याने राज्यात साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. या उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या आजारावर उपचार मिळण्यासाठी जिल्

दवाखाने सुरु ठेवा, अन्यथा कठोर भूमिका घेवू - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
·           आयएमए , निमा संघटनेसोबत बैठक ·           खासगी डॉक्टरांना अडचणी असल्यास प्रशासन मदतीसाठी तयार वाशिम ,   दि. २६ :   जिल्ह्यातील खासगी दवाखाने बंद असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून सद्यस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने नियमितपणे सुरु ठेवावेत. अन्यथा जिल्हा प्रशासनाला नाईलाजने कठोर भूमिका घ्यावी लागेल , असा इशारा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज , २६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ आयएमए ’ व ‘ निमा ’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे , उपजिल्हाधिकारी (महसूल) रमेश काळे , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर , ‘ आयएमए ’ चे अध्यक्ष डॉ. अनिल कावरखे , सचिव डॉ. अमित गंडागुळे , ‘ निमा ’ चे सचिव डॉ. राजेश चौधरी यांच्यासह दोन्ही संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले , जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवल्याने ग्रामीण भागातील

क्वारंटाईन, आयसोलेशन वार्डची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

Image
वाशिम , दि. २४ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा आवश्यक उपाययोजना करीत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला संशयित रुग्ण आढळल्यास त्याच्यावर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आला आहे. तसेच परदेशातून परत आलेल्या नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यासाठी जिल्हा महिला रुग्णालय परिसरातील शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्रात क्वारंटाईन वार्ड तयार करण्यात आला आहे. या दोन्ही वार्डची आज, २४ मार्च रोजी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक व पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, डॉ. पवार, डॉ. मडावी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी सर्वप्रथम क्वारंटाईन वार्डची पाहणी केली. या वार्डमध्ये ५० व्यक्तींना निगराणीखाली ठेवण्याची क्षमता आहे. सध्या बाधित देशातून परत आलेल्या ५ व्यक्तींना वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. यापैकी कोणालाही अद्याप कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसून सर्वांची प्रकृती चांगली असल्याची माहिती क्वारंटाईन वार्डचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांनी दिली.

संचारबंदीचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
·         जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा; खरेदीसाठी गर्दी नको ·         अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा वाशिम , दि. २४ : कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये, यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. याकरिता जिल्ह्यात संचार बंदी लागू करण्यात आली आहे. याबाबीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. अत्यावशक कारणाशिवाय घराबाहेर पडून संचारबंदीचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली. शहरातील पाटणी चौक येथील मुख्य बाजारपेठेत संचारबंदीच्या अंमलबजावणीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. पोलीस अधीक्षक वसंत परदेशी सुद्धा यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, देशात तसेच राज्यातही ‘कोरोना’चा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वाशिम जिल्ह्यातील नागरिकांचा या विषाणूच्या संसर्गापासून बचाव व्हावा, यासाठी जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून जिल्ह्यातही संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. यामधून जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंची वि

‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक गावात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती

Image
·         ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समितीत समावेश ·         प्रतिबंधात्मक उपाययोजनां अंमलबजावणीसाठी सहकार्याची जबाबदारी वाशिम , दि. २४ : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये, यासाठी सहकार्य करण्यासाठी सर्व गावांमध्ये सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. या समितीमध्ये ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांच्यासह सर्व   आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाशिम जिल्ह्यात या विषाणूच्या प्रसाराला तत्काळ प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून गावस्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये तलाठी, कृषि सहाय्यक, ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, गावात राहणारे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य यांचा समावेश असून पोलीस पाटील हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत. समितीने अत्यावश्यक कामाशिवाय गावातू

वाशिम जिल्ह्यातील शहरी भागात २३ मार्च पासून जमावबंदी आदेश लागू

Image
·         जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने बंद ·         सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद ·         आवश्यकता नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये वाशिम , दि. २२ : राज्यात नोवेल कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांसह सर्व शहरी भागात २३ मार्च २०२० रोजीच्या सकाळी ५ वाजता पासून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आले असून ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एका ठिकाणी जमाव करता येणार नसल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. नोवेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच या विषाणूचा संसर्ग होवून जीवित हानी होवू नये, या दृष्टीने जिल्हा प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. जिल्ह्यात २२ मार्च रोजी रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू होता. तो २३ मार्च २०२० रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. त्यानंतर २३ मार्च २०२० रोजीच्या सकाळी ५ वाजतापासून जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांसह सर्व शहरी भागात फौजदारी प्रक्रिया