मालेगाव तालुक्यातील कृषि सेवा केंद्र आठवड्यातून तीन दिवस राहणर सुरु



·         सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत कालावधी निश्चित
वाशिम, दि. ३० : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांकडून बियाणे, खते व कीटकनाशकांची मागणी होण्याची शक्यता लक्षात घेवून मालेगाव तालुक्यातील सर्व कृषि सेवा केंद्र प्रत्येक आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश तहसीलदार रवि काळे यांनी दिले आहेत.
बियाणे, खते यांचा समावेश जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मध्ये असल्याने या वस्तूंची विक्री करणारी दुकाने सुरु ठेवण्याबाबत नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत. त्यानुसार मालेगाव तालुक्यातील कृषि सेवा केंद्रांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. आठवड्यातील तीन दिवस विहित कालावधीत कृषि सेवा केंद्र सुरु असताना शेतकऱ्यांना उभा राहण्यासाठी दोन मीटर अंतरावर एक याप्रमाणे निशाणी आखावी. दुकानात गर्दी होवू नये, याची दक्षता घ्यावी. तसेच शेतकऱ्यांना हात धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था व हात निर्जंतुक करण्यासाठी सॅनिटायझर ठेवावेत. कोणत्याही परिस्थितीत आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी. संचारबंदीमध्ये राज्यातून किंवा परराज्यातून येणाऱ्या बियाणे, खते व कीटकनाशके यांची आयात सुरु राहील, असे आदेश तहसीलदार श्री. काळे यांनी दिले आहेत.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश