जिल्ह्यातील खासगी दवाखाने सुरु ठेवण्याचा ‘आय.एम.ए.’, ‘निमा’ संघटनेचा निर्णय


·         जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद
वाशिम, दि. २७ : जिल्ह्यातील खासगी दवाखाने बंद असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून सद्यस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने नियमितपणे सुरु ठेवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी २६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आय.एम.ए., निमा व आय.डी.ए. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत केले. या आवाहनला प्रतिसाद देत जिल्ह्यातील आय.एम.ए., निमा व आय.डी.ए. संघटनेशी संबंधित सर्व डॉक्टरांचे दवाखाने सुरु ठेवण्याचा निर्णय तिन्ही संघटनानी घेतला आहे.
तिन्ही संघटनांनी संयुक्त पत्रक काढून सर्व डॉक्टरांनी वैयक्तिक संरक्षणासह गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून गरजू रुग्णांची गैरसोय टाळता येईल, असे पत्रकात नमूद केले आहे.
आय.एम.ए., निमा आणि आय.डी.ए. संघटनेने खासगी दवाखाने सुरु ठेवण्याबाबत घेतलेल्या निर्णयाची त्यांच्या सर्व सदस्य डॉक्टरांनी अंमलबजावणी करून आपले दवाखाने सुरु ठेवावेत. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सुध्दा स्वतंत्र आदेश निर्गमित केला आहे. त्यामुळे जे डॉक्टर आपले दवाखाने पूर्ववत सुरु ठेवणार नाहीत, त्यांच्याबाबतीत जिल्हा प्रशासनाला नाईलाजाने कठोर पावले उचलावी लागतील. खासगी दवाखाने सुरु ठेवण्यासाठी डॉक्टरांना काही अडचणी येत असतील तर त्यांनी संबंधित तहसीलदार अथवा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी स्पष्ट केले आहे.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश