संचारबंदीत कृषि निविष्ठा वाहतुकीला मुभा
वाशिम, दि. २७ : कोरोना
विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये २५ मार्च २०२० पासून संचारबंदी लागू करण्यात
आली आहे. त्यानुसार सर्व खासगी व्यवसाय व आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले
आहेत. मात्र, बियाणे व खते या कृषि निविष्ठांचा जीवनावश्यक वस्तू १९५५ अंतर्गत
समावेश असल्याने संचारबंदी दरम्यान या वस्तूंच्या वाहतुकीला मुभा देण्यात येत
असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत.
राज्यात
येत्या खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे इतर राज्यात निर्मिती होवून प्रक्रिया व
विक्रीसाठी राज्यात येण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. यामध्ये खंड पडू नये,
म्हणून वाशिम जिल्ह्यातील निमशासकीय, शेतकरी उत्पादक कंपनी, खासगी कंपनीचे बीज
प्रक्रिया केंद्र, बियाणे पॅकिंग, हाताळणी केंद्र, जिल्हांतर्गत, राज्यांतर्गत व
परराज्यातून निविष्ठांची वाहतूक सुरु ठेवण्यास कृषि आयुक्ती यांनी दिली असल्याने
संचारबंदीतून या बाबींच्या वाहतुकीस मुभा देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी
दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment