अंडी, चिकन मानवी आहारासाठी सुरक्षित - डॉ. व्ही. एन. वानखडे
·
‘कोरोना’शी संबंध नाही
·
अफवांवर विश्वास ठेवू नका
वाशिम : कुक्कुट पक्षी व उत्पादने यांचा कोरोना विषाणू प्रदुर्भावाशी
कुठलाही संबंध नाही. चिकन व अंडी मानवी आहारासाठी सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा
परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही. एन. वानखडे यांनी प्रसिद्धी
पत्रकाद्वारे दिली आहे.
अंडी
व चिकनविषयी समाज माध्यमांवर आलेल्या
अफवांमुळे कुक्कुट उत्पादन व विक्रीवर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना विषाणू सांसर्गिक असून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित
होतो. तथापि, कुक्कुट पक्षामधून कोरोना विषाणू मानवामध्ये संक्रमित (इन्फेक्शन
ब्रॉकरायटिंस) होत नसल्याबाबत शास्त्रीय संदर्भ आहेत. आपल्याकडे चिकन व मटन हे
उकळून सेवन केले जात असल्याने त्या तापमानात कोणतेही विषाणू जिवंत राहू शकत नाहीत.
राज्यातील कुक्कुटपालन व्यवसाय हा देशामध्ये अव्वल स्थानवर असून कुक्कुटपालन
व्यवसायाशी मका, सोयाबीन उत्पादक शेतकरी सलंग्न आहेत. त्यामुळे समाज माध्यमांवरील
अशास्त्रीय अफवांचा अनिष्ठ परिणाम या व्यवसायांवर होत असल्याचे वास्तव आहे.
अंडी
व चिकनमधून मुबलक प्रमाणात प्रथिने व अन्य जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात मिळतात. चिकन
साधारणपणे 100 से. तापमानावर शिजविले जाते. त्यामुळे त्यात कोणतेच विषाणू जिवंत
राहू शकत नाहीत. त्यामुळे समाज माध्यमांवर आलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका व
अफवा पसरवू नका, असे आवाहन डॉ. वानखडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
Comments
Post a Comment