जीवनावश्यक वस्तूंची विक्री २४ तास सुरु ठेवण्यास मुभा
·
सोशल डिस्टन्सिंग
पाळणे आवश्यक
वाशिम, दि. २७ : संचारबंदी काळात
जीवनावश्यक वस्तूंची विक्री २४ तास सुरु ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी २६ मार्च रोजीच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील
जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने, आस्थापना २४ तास सुरु राहू शकतील, असे
आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत.
मटन,
चिकन, मासे विक्री करणारी दुकाने सुध्दा आहे त्या ठिकाणी स्वच्छता व आवश्यक
खबरदारी घेवून सुरु ठेवता येतील. सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, मटन, चिकन व
मासे विक्री करणाऱ्या दुकानदारांनी स्वखर्चाने ग्राहकांना उभे राहण्यासाठी
चुन्याच्या सहाय्याने किमान तीन मीटरचे अंतर ठेवून मार्किंग करून सोशल डिस्टन्सिंग
पाळले जाईल, याची खात्री करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले
आहे.
*****
Comments
Post a Comment