Posts

Showing posts from November, 2019

केंद्रीय पथकाने केली वाशिम जिल्ह्यातील पीक नुकसानीची पाहणी

Image
वाशिम , दि. २४ : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात आलेल्या अवेळी पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. केंद्र सरकारने या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी एक केंद्रीय पथक गठीत केले आहे. या पथकातील केंद्रीय कृषि मंत्रालयांतर्गत येणाऱ्या कापूस विकास संचालनालयाच्या कृषि व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. आर. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जिल्ह्यात नुकसान झालेल्या शेतीची आज, २४ नोव्हेंबर रोजी पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, अमरावती विभागाचे कृषि सहसंचालक सुभाष नागरे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, रिसोडचे तहसीलदार अजित शेलार, वाशिमचे तहसीलदार विजय साळवे, तालुका कृषि अधिकारी अभिजित देवगिरीकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. श्री. सिंग यांच्या पथकाने रिसोड तालुक्यातील महागाव येथील माधव गायकवाड यांच्या नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली व झालेल्या पीक नुकसानीची माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली. श्री. गायकवाड यांनी ३ हेक्टरमध्ये सोयाबीन

बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताहाचे आजपासून आयोजन

Image
वाशिम , दि. १३ : जिल्ह्यात १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहातंर्गत बालकांचे हक्क व सुरक्षितता याबाबत विविध कायदे , विधी संघर्षग्रस्त बालक , बालकांचे हकक , बालकामगार , बालविवाह , बालकांवरील लैंगिक अत्याचार , मादक द्रव्यांचा गैरवापर आणि त्याचे दुष्परिणाम आदींबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. सप्ताह आयोजनासाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) डी. बी. इंगळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तानाजी नरळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर, डायटच्या अधिव्याख्याता डॉ. क्रांती कुलकर्णी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिलीप राठोड, अॅड. गजेंद्र सरपाते, चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक महेश राऊत, अमोल देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. परदेशी म्हणाले, राज्यात ‘सर्वत्र बालकांची सुरक्षितता’ अर्थात बालकांचे हक्क व सुरक्षितता या संदर्भात १४ ते २० नोव्हे

पीक नुकसानीच्या पंचनाम्याची डाटा एन्ट्री अचूक करा - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
वाशिम , दि. ०७ : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरु आहेत. प्रत्येक पंचनाम्याची डाटा एन्ट्री करणे आवश्यक असून यामध्ये सर्व माहिती अचूक भरली जाईल, याची दक्षता संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी तसेच प्रत्येक तालुक्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पंचनामे डाटा एन्ट्री विषयक नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, उपविभागीय कृषि अधिकारी दत्तात्रय चौधरी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील सहाय्यक निबंधक आर. एल. गडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, पीक नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकांच्या नुकसानीची माहिती राज्य शासन व विमा कंपनीला पाठविण्यासाठी संगणकाच्या सहाय्याने विहित नमुन्यात भरणे व बाधित पिकांचे फोटो सादर करणे आवश्यक आहे. सर्व संबंधित तलाठी,

१९३ ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

·          ८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी सुद्धा पोटनिवडणूक ·          निवडणुकीची नोटीस आज होणार प्रसिद्ध; ८ डिसेंबर रोजी मतदान वाशिम , दि. ०५ : राज्य निवडणूक आयोगाने  वाशिम  जिल्ह्यातील१९३ ग्रामपंचायतींच्या सरपंच , सदस्य पदाच्या रिक्त जागांसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यत अस्तित्वात राहणार आहे. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती , घोषणा मंत्री , खासदार , आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठे करता येणार नाही , असे राज्य निवडणूक आयोगाने सूचित केले आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार ६ नोव्हेंबर २०१९ रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. पोट निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र १६ ते २१ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ११ वाजतापासून ते दुपारी ३ वा. दरम्यान स्वीकारले जाणार आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी २२ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजतापासून सुरु होईल. २५ नोव्

पीक नुकसानीचे पंचनामे गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
·          प्रत्यक्ष बांधावर जावून पंचानाम्यांच्या अचूकतेची केली पडताळणी ·          शेतकऱ्यांशी साधला संवाद; नुकसानीची घेतली माहिती ·          विहित मुदतीत पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना वाशिम , दि. ०५ : पंचनाम्यातील त्रुटीमुळे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे गुणवत्तापूर्ण होतील, याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज दिल्या. वाशिम तालुक्यातील सुराळा, कोंडाळा झामरे शिवारातील नुकसानग्रस्त पिकांची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच पंचनामे अचूक होण्याच्या दृष्टीने त्यांनी यावेळी काही पंचानाम्यांची पडताळणी केली. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, तालुका कृषि अधिकारी अभिजित देवगिरीकर, गट विकास अधिकारी श्री. वानखेडे यांच्यासह महसूल, कृषि व ग्रामविकास विभागाचे ग्रामस्तरीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतलेल्या व या योजनेत सहभागी न झालेल्या अशा सर्वच

खचून जावू नका, शासन तुमच्या पाठीशी आहे !

Image
·          नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी पालकमंत्री संजय राठोड यांचा संवाद ·             परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पालकमंत्र्यांकडून पाहणी ·             वाशिम जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीची माहिती राज्य शासनाला देणार वाशिम , दि. ०२ : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात उभे असलेले सोयाबीन तसेच काढणी झालेल्या सोयाबीनसह इतरही भाजीपाला, फळपिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. मात्र शेतकऱ्यांनी या संकटामुळे खचून न जाता त्याचा धीराने सामना करावा. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती मुख्यमंत्र्यांना देवून शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी करणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री श्री. राठोड आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी, उपविभागीय अधिकारी अनुप खांडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिक