बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताहाचे आजपासून आयोजन
वाशिम, दि. १३ : जिल्ह्यात १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताहाचे
आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहातंर्गत बालकांचे हक्क व सुरक्षितता याबाबत विविध
कायदे, विधी संघर्षग्रस्त बालक, बालकांचे हकक,
बालकामगार,
बालविवाह,
बालकांवरील लैंगिक अत्याचार, मादक
द्रव्यांचा गैरवापर आणि त्याचे दुष्परिणाम आदींबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. सप्ताह
आयोजनासाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक
वसंत परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
यावेळी
अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) डी. बी.
इंगळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तानाजी नरळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास
मानकर, डायटच्या अधिव्याख्याता डॉ. क्रांती कुलकर्णी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी
दिलीप राठोड, अॅड. गजेंद्र सरपाते, चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक महेश राऊत, अमोल
देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा
पोलीस अधीक्षक श्री. परदेशी म्हणाले, राज्यात ‘सर्वत्र बालकांची सुरक्षितता’ अर्थात
बालकांचे हक्क व सुरक्षितता या संदर्भात १४ ते २० नोव्हेंबर दरम्यान जनजागृती सप्ताह
राबविण्यात येत आहे. बालकांना त्यांचे हक्क व बालकाविरुद्ध अत्याचाराविषयी माहिती देवून
अशा अत्याचारांना प्रतिबंध करणे हे प्रत्येकाची जबाबदारी असून याबाबत सप्ताह कालावधीत
प्रभावी जनजागृती करण्यात येणार आहे. विविध शासकीय विभागांच्या सहकार्याने
जिल्ह्यात जनजागृती रॅली, शिक्षक-पालक संयुक्त बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. यामाध्यमातून
बालकांच्या संदर्भातील विविध कायदे, विधीसंघर्षित बालक, बालकांचे हक्क आदी बाबींविषयी
जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण
विभाग, महिला व बाल कल्याण विभाग आणि चाईल्ड लाईन यांनी या सप्ताहाच्या अनुषंगाने
केलेल्या नियोजनाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. परदेशी यांनी घेतली. तसेच
सर्व संबंधित विभागांनी सप्ताह कालावधीत विविध उपक्रम राबवून बालक व पालकांमध्ये जनजागृती
करावी, असे आवाहन केले.
Comments
Post a Comment