१९३ ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर


·         ८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी सुद्धा पोटनिवडणूक
·         निवडणुकीची नोटीस आज होणार प्रसिद्ध; ८ डिसेंबर रोजी मतदान
वाशिम, दि. ०५ : राज्य निवडणूक आयोगाने वाशिम जिल्ह्यातील१९३ ग्रामपंचायतींच्या सरपंच, सदस्य पदाच्या रिक्त जागांसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यत अस्तित्वात राहणार आहे. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठे करता येणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने सूचित केले आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार ६ नोव्हेंबर २०१९ रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. पोट निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र १६ ते २१ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ११ वाजतापासून ते दुपारी ३ वा. दरम्यान स्वीकारले जाणार आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी २२ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजतापासून सुरु होईल. २५ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. त्याचदिवशी दुपारी ३ वा. नंतर निवडणूक चिन्हांचे वाटप होईल व अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. आवश्यकता असल्यास ८ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वा. पर्यंत मतदान घेण्यात येईल. मतमोजणी ९ डिसेंबर २०१९ रोजी होईल व १२ डिसेंबर २०१९ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.
थेट सरपंच निवडीसाठी पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती
जिल्ह्यातील ८ ग्रामपंचातींच्या सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील गोंडेगाव, मालेगाव तालुक्यातील केळी, कुत्तरडोह, रिसोड तालुक्यातील घोन्सर, मंगरूळपीर तालुक्यातील वसंतवाडी, मानोरा तालुक्यातील खांबाळा, कारंजा तालुक्यातील झोडगा व म्हसला या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सदस्य पदासाठी पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती
वाशिम तालुका (३१) : तांदळी बु., वारा जहांगीर, सावंगा जहांगीर, ब्रह्मा, किनखेडा, तोरणाळा, अनसिंग, पिंपळगाव, वाळकी जहांगीर, काजळंबा, वारला, अंजनखेडा, सोनखास, घोटा, हिस्सेबोराळा, सावरगावबर्डे, शेलगाव, असोला जहांगीर, चिखली बु. कार्ली, शेलू बु., नागठाणा, फाळेगाव थेट, सोंडा, सुकळी, ढिल्ली, हिवरा रोहिला, उमरा कापसे, टनका, सूपखेला, देवठाणा.
रिसोड तालुका (४१) : वाघी खु., दापुरी खु. केशवनगर, रिठद, कुकसा, जोगेश्वरी, बेलखेड, हिवरापेन, पार्डी कोयाळी बु., तिखे, कोयाळी खु., किनखेड, लिंगा कोतवाल, घोटा, वाडी रायताळ, निजामपूर, कुऱ्हा, धोडप खुर्द, पेनबोरी, चाखोली, मोहजाबंदी, मांडवा, पिंपरखेड, बोरखेडी, नावली, गोभणी, नेतान्सा, लोणी बु., चिंचंबाभर, वनोजा, कंकरवाडी, केनवड, पळसखेड, व्याड, हराळ, देऊळगाव बंडा, सवड, वाकद, येवती, आगरवाडी, चिंचाबापेन.
कारंजा तालुका (३५) : खेर्डा बु. कार्ली, शेवती, मुरंबी, शेलू बु. , भामदेवी, सोहळ, गायवळ, आखतवाडा, अंतरखेड, भिवरी, भूलोडा, दादगाव, धनज खु., ढगारखेड, धोत्रा देशमुख, दिघी, डोंगरगाव, काकडशिवणी, कामठा, खेर्डा कारंजा, लोहगाव, लोणी अरब, पलाणा, पिंप्री वरघट, पोहा, शहा, शिवण, टाकळी खु., तारखेड, विळेगाव, वडगाव इजारा, वढवी, वाघोला.
मानोरा तालुका (३५) : वापटा, आमगव्हाण, चोंढी, कारपा, सोमनाथनगर, हातना, माहुली, गिर्डा, वसंतनगर, खापरदरी, रुद्राळा, म्हसनी, रोहणा, जनुना खु., पोहरादेवी, आमदरी, धावंडा, भुली, पंचाळा, हिवरा खु. वटफळ, साखरडोह, अभईखेडा, भिलडोंगर, गोस्ता, भोयणी, देवठाना, सावळी, रुई, गव्हा, तळप बु., कोंडोली, पारवा, अजनी, दापुरा खुर्द. 
मंगरूळपीर तालुका (१९) : पार्डी ताड, भडकुंभा, निंबी, कासोळा, पारवा, मानोली, कोठारी, पिंपळखुटा, जोगलदरी, चांधई, पिंपळगाव, कुंभी, गोलवाडी, पिंप्री खु. मोतसावंगा, मसोला बु., दाभा, चिखली, ईचा.
मालेगाव तालुका (२४) : चांडस, उमरवाडी, बोरगाव, जोडगव्हाण, डोंगरकिन्ही, भौरद, सोनाळा, बोराळा न. का., गांगलवाडी, कवरदरी, खैरखेडा, आमखेडा, तरोडी, हनवतखेडा, झोडगा बु., मसला खु., पिंपळा, मुंगळा, वाकळवाडी, वाघळूद, दुधाळा, पानगरी धनकुटे, राजुरा, माळेगाव न.कि.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे