Posts

Showing posts from March, 2017

बेरोजगार युवकांना स्वावलंबी बनण्यासाठी मुद्रा योजना उपयुक्त - उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक

Image
·          मंगरूळपीर येथे प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा ·          बँकिंग क्षेत्रातील विविध तज्ज्ञांकडून उपस्थितांना मार्गदर्शन वाशिम ,  दि .  २४  :     प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेली मुद्रा योजना बेरोजगार युवकांना स्वावलंबी बनण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मंगरूळपीर तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपला स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरु करावा, असे प्रतिपादन मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक यांनी केले. जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा अग्रणी बँक व मंगरूळपीर तहसील कार्यालयाच्यावतीने आयोजित प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी तहसीलदार के. बी. सुरडकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक अनिल गोतमारे, सागर भुतडा, स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक एच. झेड. कोचर, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक एम. एस. जोग, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी श्री. पारनाईक म्हणाले की, कोणत्याही प्रकारचे मो

मुद्रा योजनेचा लाभ घेऊन व्यावसायिक, उद्योजक बना - डॉ. शरद जावळे

Image
·          कारंजा येथील मुद्रा कर्ज मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद वाशिम ,  दि .  १२  :     बेरोजगार युवकांना स्वतःचा उद्योग व व्यवसाय सुरु करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु करणायत आली आहे. या योजनेचा लाभ घेऊन तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरु करून व्यावसयिक, उद्योजक बनावे, असे प्रतिपादन कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी केले. प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या प्रचारासाठी जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा अग्रणी बँक व कारंजा तहसील कार्यालयाच्यावतीने आयोजित प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, तहसीलदार सचिन पाटील, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र (आरसेटी)चे संचालक प्रदीप पाटील, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक अनिल गोतमारे,  बँक ऑफ बडोदाचे जितेंद्र नवलाखा,  पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुधाकर जाधव, गट समन्वयक वर्षा ठाकरे, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उ

‘मुद्रा’ योजनेमुळे बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी - विजय खंडरे

Image
·          मालेगाव येथे प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा वाशिम ,  दि .  २२  :   प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून बेरोजगार युवकांना सहज व कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही लहान-मोठे उद्योग, व्यवसाय सुरु होऊन बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास प्रबंधक विजय खंडरे यांनी सांगितले. मालेगाव येथील जुने बसस्थानक परिसरात जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन व जिल्हा अग्रणी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, तहसीलदार रवी राठोड, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक चंद्रशेखर धारगावे, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप आदी उपस्थित होते. या मेळाव्याला तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. श्री. खंडरे म्हणाले की, मुद्रा योजनेतून कर्ज मिळविण्यासाठी युवकांनी प्रथम आपला व्यवसाय निश्चित करावा. त्यानुसार आवश्यक यंत्र सामग्री अथवा कच्चा मालाच

लघु उद्योग उभारण्यासाठी मुद्रा योजना फायदेशीर - तहसीलदार अमोल कुंभार

Image
·          रिसोड येथे प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा ·          बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन वाशिम ,  दि .  २१  :   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मुद्रा योजनेतून सहज व कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असल्याने ही योजना स्वतःचा लघु उद्योग उभारण्यासाठी फायदेशीर ठरत आहे. गरजू, होतकरू बेरोजगार युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घेऊन आपला उद्योग, व्यवसाय सुरु करावा, असे आवाहन तहसीलदार अमोल कुंभार यांनी केले. जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा अग्रणी बँक व रिसोड तहसीलदार कार्यालयाच्यावतीने आयोजित प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्याच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी विजय खंडरे होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक विजय नगराळे, अलाहाबाद बँकेचे व्यवस्थापक प्रदीपकुमार मिश्रा, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक सौरभ देशमुख, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप आदी उपस्थित होते. तहसीलदार श्री. कुंभार म्हणाले की,  प्रधानमंत्री मुद्रा कर्ज

रोखरहित व्यवहार, सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची चित्ररथाद्वारे होणार जनजागृती

Image
·         जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दाखविली हिरवी झेंडी वाशिम , दि . ०१ :  जिल्ह्यात रोखरहित (कॅशलेस) व्यवहार व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची जनजागृती करण्यासाठी चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज या चित्ररथांना हिरवी झेंडी दाखविली. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये रोखारहित व्यवहार व सामाजिक न्याय विभागाच्या योजनांविषयी माहिती पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने हे चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बालासाहेब बोराडे, जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहाय्यक तानाजी घोलप, दिलीप काळे आदी उपस्थित होते. रोखरहित व्यवहारविषयी जनजागृतीकरिता तयार करण्यात आलेला चित्ररथ दि. १ मार्च ते दि. ११ मार्च २०१७ या कालावधीत जिल्ह्यामध्ये फिरविला जाणार आहे. प्

जुन्या अभिलेखांच्या प्रती मिळणार एका क्लिकवर

Image
·           जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एटीडीएम’ मशिन कार्यान्वित ·           नागरिकांचे पैसे, वेळेत होणार बचत वाशिम ,  दि .  २४  :    जिल्ह्यातील नागरिकांना कमी कालावधीत जुन्या अभिलेखांच्या प्रती मिळाव्यात, याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात एनी टाईम डॉक्युमेंट्स मशिन (एटीडीएम) कार्यान्वित करण्यात आले आहे. यामधून एटीएम मशिन प्रमाणेच कार्यपध्दती असलेल्या या मशिनमधून सातबारा, फेरफार, हक्क नोंदणी रजिस्टर, कोतवाल बुक नक्कल व पेरेपत्रक आदी पाच प्रकारच्या अभिलेखांच्या प्रती मिळविता येणार आहेत. जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील नागरिकांचे सातबारा, फेरफार, हक्क नोंदणी रजिस्टर, कोतवाल बुक नक्कल व पेरेपत्रक आदी अभिलेख एटीडीएम मशिनद्वारे मिळविता येतील. हक्क नोंदणी रजिस्टर, पेरेपत्रक व सातबाराची प्रत मिळविण्याकरिता गट नंबर किंवा सर्व्हे नंबर माहित असणे आवश्यक आहे. त्याधारे आपल्याला आवश्यक सातबारा शोधून त्यांची प्रिंट घेता येईल. याचप्रमाणे गट नंबर, सर्व्हे नंबर किंवा फेरफार क्रमांक टाकून फेरफार अभिलेखाची प्रत मिळविता येईल. तसेच संबंधित वर्षाच्या माहितीद्वारे कोतवाल बुक नक्कल मिळविता ये