Posts

Showing posts from December, 2019

नामनिर्देशन पत्रांची मंगळवारी होणार छाननी

वाशिम जिल्हा परिषद , पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक वाशिम , दि. २३ : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या ०६ पंचायत समितींच्या सार्वत्रिक कार्यक्रमानुसार १८ ते २३ डिसेंबर २०१९ या कालावधीत उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात आली आहेत. या नामनिर्देशन पत्रांची छाननी मंगळवार, २४ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्र छाननीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २४ डिसेंबर २०१९ रोजी वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रसिद्ध कराण्यात येईल. ज्याठिकाणी अपील दाखल झाले आहे, अशा ठिकाणी वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी ३० डिसेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केली जाईल. अपील नसणाऱ्या ठिकाणी ३० डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत व अपील असणाऱ्या ठिकाणी १ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच्या कालावधीत नामनिर्देशन पत्रे मागे घेता येतील. अपील नसणाऱ्या ठिकाणी ३० डिसेंबर २०१९ रोजी दुपारी ३.३० वा. नंतर व अपील असणाऱ्या ठिकाणी १ जानेवारी २०२० रोजी दुपारी ३.३० वा. नंतर निवडणूक लढविणाऱ्या उम

वाशिम जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी निरीक्षक नियुक्त

Image
वाशिम , दि. २३ : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत ०६ पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (भ्रमणध्वनी क्र. ९८४५५६८९१७) हे मुख्य निवडणूक निरीक्षक असतील. वाशिम , रिसोड व मालेगाव पंचायत समिती निवडणुकीकरिता प्रमोदसिंह दुबे (भ्रमणध्वनी क्र. ९८२२५९३०२३) यांची तर कारंजा , मंगरुळपीर व मानोरा पंचायत समिती निवडणुकीकरिता एन. के. लोणकर (भ्रमणध्वनी क्र. ७५८८८७३४६९) यांची निवडणूक निरीक्षक   म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे , असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. *****

जिल्ह्यात ७ जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

वाशिम , दि. २३ : जिल्ह्यात २५ डिसेंबर २०१९ क्रोजी ख्रिश्चन बांधवांतर्फे नाताळ सण साजरा करण्यात येतो. ३१ डिसेंबर २०१९ व १ जानेवारी २०२० रोजी नववर्षाचे स्वागत करण्याकरिता विविध प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. १९ नोव्हेंबर २०१९ रोजीपासून जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आचारसंहिता लागू आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होण्यासाठी २४ डिसेंबर २०१९ ते ७ जानेवारी २०२० दरम्यान वाशिमचे जिल्हा दंडाधिकारी यांनी जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश यांनी लागू केला आहे. या कालावधीत शस्त्रे , सोटे , तलवारी , भाले , दंडे , बंदुका , सुरे , लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे , कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे , दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची साधने जवळ बाळगणे , जमा करणे किंवा तयार करणे ,   व्यक्तीचे प्रेत अथवा मनुष्याकृती प्रतिमा यांचे बीभत्स प्रदर्शन करणे , वाद्य वाजविणे , किंकाळ्या फोडणे किंवा जाहीरपणे प्रक्षोभक घो

वाशिम जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Image
·         रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार ·         सौर कृषिपंप वापरावर भर देणार ·         ग्रामीण भागातील रस्ते सुधारणार ·         रुग्णालयासाठी निधी देणार नागपूर, दि. १८ : राज्यातील आकांक्षीत जिल्ह्यांपैकी एक असलेल्या वाशिम जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांखाली निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर भौगोलिक रचनेमुळे जिल्ह्यात सिंचनासाठी मोठे प्रकल्प उभारणे शक्य नसले तरी लघुसिंचन प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. विधानभवन येथील मंत्री परिषद सभागृहात झालेल्या वाशिम जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार लखन मलिक, आमदार अमित झनक, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात सिंचनासाठी मोठे प्रकल्प नाहीत. त्यामुळे सिंचनाचा भार हा लघु प्रकल्पांवर आहे. अडाण