नामनिर्देशन पत्रांची मंगळवारी होणार छाननी


वाशिम जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक
वाशिम, दि. २३ : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या ०६ पंचायत समितींच्या सार्वत्रिक कार्यक्रमानुसार १८ ते २३ डिसेंबर २०१९ या कालावधीत उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात आली आहेत. या नामनिर्देशन पत्रांची छाननी मंगळवार, २४ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून करण्यात येणार आहे.
नामनिर्देशन पत्र छाननीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २४ डिसेंबर २०१९ रोजी वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रसिद्ध कराण्यात येईल. ज्याठिकाणी अपील दाखल झाले आहे, अशा ठिकाणी वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी ३० डिसेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केली जाईल. अपील नसणाऱ्या ठिकाणी ३० डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत व अपील असणाऱ्या ठिकाणी १ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच्या कालावधीत नामनिर्देशन पत्रे मागे घेता येतील. अपील नसणाऱ्या ठिकाणी ३० डिसेंबर २०१९ रोजी दुपारी ३.३० वा. नंतर व अपील असणाऱ्या ठिकाणी १ जानेवारी २०२० रोजी दुपारी ३.३० वा. नंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व निशाणी वाटप करण्यात येईल.
नामनिर्देशनपत्रे स्वीकारणे अथवा अस्वीकारणे याविषयी जिल्हा न्यायाधीशांकडे २७ डिसेंबर २०१९ पर्यंत अपील करता येईल. जिल्हा न्यायाधीशांनी या अपिलावर निकाल देण्याची संभावित शेवटची तारीख ३० डिसेंबर २०१९ राहील. आवश्यक असेल अशा ठिकाणी ७ जानेवारी २०२० रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. मतमोजणी बुधवार, ८ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरु होईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे