वाशिम जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी निरीक्षक नियुक्त
वाशिम, दि. २३ : जिल्हा परिषद
व त्याअंतर्गत ०६ पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांच्या
नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष
प्रसाद (भ्रमणध्वनी क्र. ९८४५५६८९१७) हे मुख्य निवडणूक निरीक्षक असतील.
वाशिम, रिसोड व मालेगाव
पंचायत समिती निवडणुकीकरिता प्रमोदसिंह दुबे (भ्रमणध्वनी क्र. ९८२२५९३०२३) यांची तर
कारंजा, मंगरुळपीर व मानोरा पंचायत समिती निवडणुकीकरिता एन. के.
लोणकर (भ्रमणध्वनी क्र. ७५८८८७३४६९) यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment