Posts

Showing posts from February, 2022

घरकुलाच्या लाभार्थ्यांनी आमिषाला बळी पडू नये *जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे आवाहन

Image
*घरकुलाच्या लाभार्थ्यांनी आमिषाला बळी पडू नये*   जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे आवाहन  वाशिम दि.२६(जिमाका)जिल्ह्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या विविध घटकातील पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल मिळवून देण्याचे काम पंतप्रधान आवास योजना,रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजनेअंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे.ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले आहे,केवळ त्यांनाच पासबुक व जॉब कार्डची झेरॉक्स प्रत, जागेचा आठ -अ ,100 रुपयांचा बॉण्ड पेपर आदी कागदपत्रांची मागणी पंचायत समितीकडून संबंधित गावच्या ग्रामसेवकाला करण्यात येत आहे. त्यामुळे घरकुलाच्या पात्र लाभार्थ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. घरकुल लवकर मंजूर करून देतो असे कोणी सांगून पैशाची मागणी करीत असतील तर आर्थिक व्यवहार करू नये.तसेच कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये.याबाबत संबधित पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांना तातडीने कळवावे.असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील निकम यांनी केले आहे.         सन २०१८ मध्ये विविध घटकातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी सर्वेक्षण सु

अमानी येथील गोडंबी युनिटची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी बचतगटांच्या महिलांशी साधला संवाद

Image
  अमानी येथील गोडंबी युनिटची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी बचतगटांच्या महिलांशी साधला संवाद           वाशिम, दि. २ 5 (जिमाका) : मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत महिला आर्थिक विकास मंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्र मालेगाव - २ च्या वती ने सुरू करण्यात येणाऱ्या मालेगाव तालुक्यातील अमानी येथील गोडंबी युनिटची पाहणी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज २५ फेब्रुवारी रोजी भेट देऊन केली. यावेळी मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, तहसीलदार रवी काळे, अमानीच्या सरपंच रंजना जाधव, लोकसंचालीत साधन केंद्राचे व्यवस्थापक प्रा. शरद कांबळे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.                महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत लोकसंचालित केंद्र मालेगाव-२ च्या माध्यमातून मानव विकास कार्यक्रमांतर्गत गोडंबी ट्रेनिंग व मार्केटिंगचे युनिट अमानी येथील महिला बचतगटांच्या अनुसूचित जाती व जमातीच्या महिलांच्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहे. तसा प्रस्ताव मानव विकास मिशनमार्फत मंजूर करण्यात आला आहे. या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी आज जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यांनी केली. यावेळी त्यांनी बचतगटाच्या
Image
  काटा येथील अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश              वाशिम, दि. २ 5 (जिमाका) : जिल्हयातील वाशिम तालुक्यातील काटा या गावात आज २५ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी १२ वाजता बालविवाह होत असल्याबाबतची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक धर्मराज चव्हाण, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आलोक अग्रहरी यांना अगदी वेळेवरच प्राप्त झाली होती. त्यामुळे हा बालविवाह थांबविण्याचे मोठे आवाहन जिल्हा प्रशासनापुढे होते. ताबडतोब संपूर्ण यंत्रणा कामी लावून ऐन वेळेवर हा बाल विवाह थांबविण्यात प्रशासनास यश मिळाले.                  वाशिम येथून अवघ्या 5 किमी अंतरावर असलेल्या काटा या गावी एका 14 वर्षीय बलिकेचा बालविवाह लावून देण्यात येणार असल्याची गुप्त माहिती चाईल्ड हेल्प लाईनवर प्राप्त झाली होती. वेळ अगदी कमी होता आणि एक निरागस अल्पवयीन बालिकेच्या आयुष्याचा प्रश्न होता. एका तासभरात सर्व प्रक्रिया पूर्ण करायची होती. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आलोक अग्रहरी यांनी लगेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड लाईन वाशिमचे अधिकारी यांना पथकासह घटनास्थळी जाऊन बाल विवाह थ

बनावट क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजनेस मंजुरी

  बनावट क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजनेस मंजुरी            वाशिम, दि. २ 5 (जिमाका) : बनावट खेळाडू प्रमाणपत्रधारक युवा खेळाडूंचे संपुर्ण भवितव्य अडचणीत येऊ नये यासाठी अशा खेळाडूंना एक संधी देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने बनावट क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजनेला मंजुरी दिली आहे.               राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदके प्राप्त करणारे खेळाडू राष्ट्रीय तसेच राज्यास लौकिक प्राप्त करुन देतात. खेळाडूंना प्राप्त होण्याच्या संधी व शैक्षणिक पात्रता मिळविण्याचा कालावधी एकच असल्याने त्यांना दोन्ही आघाडीवर सारख्या प्रमाणात लक्ष देणे शक्य नसते. त्यामुळे त्यांची शैक्षणिक क्षेत्रात पिछेहाट होते. नोकरी, व्यवसायाच्या स्पर्धेत ते अन्य विद्यार्थ्यांशी स्पर्धा करु शकत नाही. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने गुणवत्ताधारक खेळाडूंना १ जुलै २०१६ च्या शासन निर्णयानुसार नोकरीमध्ये ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडू आरक्षण हा शासकीय सेवेत प्रवेश करण्याचा सोपा मार्ग असल्याचे मानून बरेच खेळाडू बनावट क्रीडा प्रमाणपत्र धारण करतात आणि त्या आधारे शासकीय स

जिल्ह्यातील नागरिक व विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्यास संपर्क साधावा

  जिल्ह्यातील नागरिक व विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्यास संपर्क साधावा           वाशिम, दि. २ 5 (जिमाका) : रशिया आणि युक्रेन या देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेन या देशात भारतीय नागरिक/विद्यार्थी अडकले असण्याची शक्यता आहे. दिल्ली येथे नागरिकांसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली टोल फ्री क्रमांक- १८००११८७९७, फोन ०११-२३०१२११३/२३०१४१०४/२३०१७९०५ आणि ई-मेल-situationroom@mea.gov.in यावर आणि वाशिम जिल्ह्यातील कोणतेही नागरिक/ विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम फोन नं.०७२५२-२३४२३८, मोबाईल क्रमांक-८३७९९२९४१५, ईमेल - rdc_washim@rediffmail.com   तसेच जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे ०७२५२ - २३४८३४ आणि मोबाईल नं.८६०५८७८२५४ यावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. *******

२७ फेब्रुवारीला पल्स पोलिओ लसीकरण मोहिम१ लाख २१ हजार २६८ बालकांना पाजणार पोलिओ डोस

Image
२७ फेब्रुवारीला पल्स पोलिओ लसीकरण मोहिम १ लाख २१ हजार २६८ बालकांना  पाजणार पोलिओ डोस           वाशिम, दि. २४ (जिमाका) :  पल्स पोलिओ लसीकरण मोहिम १९९५ पासून राबविण्यात येत आहे. सन २०२२ या वर्षात २७ फेब्रुवारी २०२२  रोजी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ० ते ५ वर्ष वयोगटातील अपेक्षित लाभार्थी बालकांची संख्या ग्रामीण भागात ८६,०६४ आणि नागरी भागात ३५,२०४ अशी एकूण १ लाख २१ हजार २६८ आहे.त्यासाठी ग्रामीण भागात ८३१ आणि नागरी भागात १३० असे एकूण ९६१ पल्स पोलिओ लसीकरण बूथ राहणार आहे. बुथवर काम करण्यासाठी ग्रामीण भागात २१५९ आणि नागरी भागात ३८२ असे एकूण २५४१ मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे.ही मोहीम प्रभावीपणे ग्रामीण भागात राबविण्यासाठी १६८ व शहरी भागासाठी २६ असे एकूण १९४ पर्यवेक्षक नियुक्त केले आहे.               २७ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजतापासून या मोहिमेला सुरुवात होईल.सायंकाळी ५ वाजेपर्यंत ० ते ५ वर्षाखालील सर्व बालकांना लस पाजण्याचे काम करण्यात येईल.  वीटभट्टया,गिट्टी खदान व एकदा मजुरांच्या वस्त्यांमधील लाभार्थी संरक्षित करण्यासाठी ग्रामीण भागात २४ आणि नागरी भागात ८ असे एकूण ३२ मोबा

भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर योजनांचे विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज महाडीबीटी पोर्टलवर २८ फेब्रुवारीपर्यंत भरावे

भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर योजनांचे विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज महाडीबीटी पोर्टलवर २८ फेब्रुवारीपर्यंत भरावे वाशिम, दि.२२ (जिमाका) अनुसूचित जाती,विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या मॅटीकोत्तर शिष्यवृत्ती/शिक्षण फी,परीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन योजनांचे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील अर्ज स्विकारण्यासाठी  १४ डिसेंबर २०२१ पासून नवीन प्रवेशित व नूतनीकरणाचे विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी कार्यान्वित करण्यात आले आहे.              सन २०२१-२२ मधील अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्याथ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांचे https://mahadbtimahait.gov.in या महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घ्यावे. तसेच महाविद्यालयात प्रवेशीत विद्यार्थ्यांना सन २०२१-२२ सत्रातील महाडिबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. २८ फेब्रुवारी असल्याबाबत महाविद्यालय स्तरावरून अवगत करावे.तसेच महाविद्यालयानी जास्त प्रमाणात नोदणीकृत होतील याकडे

जास्तीत जास्त प्रकरणे मध्यस्थीने मिटवावीत न्या.श्रीमती एस. एस. सावंत

Image
जास्तीत जास्त प्रकरणे मध्यस्थीने मिटवावीत       न्या.श्रीमती एस. एस. सावंत वाशिम, दि. २२ (जिमाका) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांच्या संयुक्तवतीने जिल्हा न्यायालय येथे मध्यस्थी संबंधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन आज २२ फेब्रुवारी रोजी करण्यात आले.यामध्ये मध्यस्थी प्रक्रीयेतील विविध टप्पे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव एस. पी. शिंदे यांनी केले.न्या.श्रीमती एस. जी. फुलबांधे,व ऍड.एस.एन.काळु यांनी मध्यस्थी प्रकीयेतील विविध टप्पे काय आहेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा न्या.श्रीमती एस. एस. सावंत यांनी उपस्थितांना त्यांचे तंटे मध्यस्थीच्या माध्यमातुन मिटविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला न्या.एस.एम.मेनजोगे, तसेच जिल्हा न्यायालयातील न्यायीक अधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन/न्या. श्रीमती सुप्रिया देशमुख यांनी केले. आभार जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव ऍड.एन टी.जुमडे यांनी म

आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

Image
आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन वाशिम,दि.२०(जिमाका) मराठी वृत्तपत्राचे जनक आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्ताने आज २० फेब्रुवारी रोजी जिल्हा माहिती कार्यालय येथे  अभिवादन करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण केला.यावेळी पत्रकार अनिल वाल्ले,सुनील मिसर,विश्वनाथ राऊत,गणेश भालेराव,डॉ.माधव हिवाळे,श्री.अवताडे तसेच कार्यालयातील कर्मचारी विजय राठोड व अनिल कुरकुटे उपस्थित होते.उपस्थित पत्रकार व कर्मचाऱ्यांनी सुध्दा बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.

कोरोना सानुग्रह अनुदान *२६० मृतांच्या वारसांकडून कागदपत्रे मागविली* २४ फेब्रुवारीला वाशिम येथे शिबिर

कोरोना सानुग्रह अनुदान *२६० मृतांच्या वारसांकडून कागदपत्रे मागविली*  २४ फेब्रुवारीला वाशिम येथे शिबिर  वाशिम दि.१९( जिमाका) कोविड -१९ मुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्ह्यात कोविडमुळे आतापर्यंत ६४० व्यक्तींचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ३८० मृतांच्या वारसांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी अर्ज केले आहे. उर्वरित २६० मृतांच्या वारसांनी अद्यापही सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी अर्ज केलेला नाही. तरी या वारसांनी येत्या २४ फेब्रुवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित शिबिरात आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.            मृत्युमुखी पडलेल्या उर्वरित २६० व्यक्तींच्या वारसाने अर्थात अर्जदाराने स्वतःचे आधारकार्ड व त्याची साक्षांकित झेरॉक्स प्रत, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे आधारकार्ड व त्याची साक्षांकित प्रत, मृत्यु प्रमाणपत्र, बँकेचे स्टेटमेंट किंवा धनादेश, कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा आरटीपीसीआर चाचणीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट तसेच कोविडमुळे

जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी केली गिट्टी खदानची पाहणी, तलाठी साजा तपासणी व तहसील कार्यालयाला भेट

Image
जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी केली गिट्टी खदानची पाहणी, तलाठी साजा तपासणी व तहसील कार्यालयाला भेट वाशिम दि.१९(जिमाका) जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी  १८ फेब्रुवारी रोजी रिसोड तालुक्यातील मौजा चिचांबापेन शिवारातील गिट्टीखदानची पाहणी केली.रिसोड येथील तलाठी साजा क्रमांक १  ला भेट देऊन दप्तर तपासणी केली व सुंदर माझे कार्यालय या उपक्रमांतर्गत रिसोड तहसील कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली.यावेळी तहसीलदार अजित शेलार प्रामुख्याने उपस्थित होते.              मौजे चिचाम्बापेन येथील भागवत देशमुख यांच्या गिट्टी खदानला जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांनी भेट दिली. यावेळी मंडळ अधिकारी श्री.लोखंडे तलाठी पी.पी.बाविस्कर व भागवत देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. गिट्टीखदानमध्ये करण्यात येणारे ब्लास्टिंग हे अधिकृत परवानाधारकाकडूनच करण्यात यावे असे श्री.षण्मुगराजन यांनी श्री.देशमुख यांना सांगितले.तसेच पर्यावरणाची हानी व प्रदूषण होणार नाही याबाबत दक्षता बाळगून काम करण्यात यावे असे ते म्हणाले. या खदानला प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी असल्याचे तहसीलदार श्री शेलार यांनी यावेळी सांगितल

नेतनसा,कंकरवाडी व आगरवाडीच्या शेतकरी बचतगटांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Image
नेतनसा,कंकरवाडी व आगरवाडीच्या शेतकरी बचतगटांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट    *  शेतपिकांची पाहणी    *  शेतकरी बचतगटांशी साधला         संवाद     * अवजार बँक व जलसंधारण          कामाची पाहणी  वाशिम दि.१९ (जिमाका) रिसोड तालुक्यातील नेतनसा,कंकरवाडी व आगरवाडी येथील शेतकरी बचतगटांना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी १८ फेब्रुवारी रोजी भेट दिली.यावेळी शेतातील पिकांची पाहणी करून बचतगटांच्या शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच अवजार बँक व जलसंधारण कामाची देखील पाहणी केली.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार,जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री.आकोसकर,तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप,तंत्र अधिकारी श्री कंकाळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.             नेतनसा येथील शेतकरी दीपक बाजड व गजानन बाजड यांच्या सेंद्रिय शेतीला भेट दिली.  महाज्योतीअंतर्गत लावलेल्या करडई पिकाची तसेच सेंद्रिय पद्धतीने लावलेल्या गहू पिकाची पाहणी केली. संत्रा व नवीन पद्धतीने लावलेल्या मोसंबी पिकाची देखील पाहणी केली. मोसंबीत घेण्यात येत असलेल्या आंतरपिकाची पाहणी करून श्री. बाजड यांच्याकडून माहिती जाणून घेतली.यावेळी बाजड यांच्या दालमि

मग्रारोहयो अंतर्गत जिल्ह्यातील अकुशल मजुरांना रोजगार पुरविण्यासाठी विशेष मोहिम

Image
मग्रारोहयो अंतर्गत जिल्ह्यातील अकुशल मजुरांना रोजगार पुरविण्यासाठी विशेष मोहिम वाशिम,दि. १८  (जिमाका)-  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर विविध स्वरुपाची कामे शेल्फवर उपलब्ध आहे. या कामांवर अकुशल काम करण्यास सक्षम असलेल्या प्रौढ व्यक्तींना गावातच रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो.त्याअनुषंगाने इच्छुक व्यक्तींना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच जिल्ह्यातुन कामानिमित्त मजुरांचे होणारे स्थलांतर थांबविणे आणि मजुरांना मागणीनुसार काम तात्काळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अकुशल मजुरांना रोजगार पुरविण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.         21 फेब्रुवारी 2022 पासुन मग्रारोहयोअंतर्गत ग्रामीण कुटूंबांना काम मागणीचे अर्ज (नमुना क्र.4) तहसिल व पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.कामाच्या मागणीचे अर्ज 24 फेब्रुवारी 2022 पासुन तहसिल व पंचायत समिती स्तरावर स्वि‍कारले जाणार आहे. या अर्जाची रितसर पोच (नमुना क्र.5 मध्ये ) संबंधीत कार्यालयाकडुन देण्यात येणार आहे.        काम मागणी अर्जासोबत बँक पासबुक (आधार लिंक असलेल्या बँ

कृषी संकुलाचे बांधकाम विहित वेळेत पूर्ण करा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

Image
कृषी संकुलाचे बांधकाम विहित वेळेत पूर्ण करा               जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. वाशिम दि.१७ (जिमाका) जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांच्यापर्यंत कृषीविषयक तंत्रज्ञान पोहचविण्यासोबतच त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यातील पहिले स्व.बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषी संकुल वाशिम येथे उभारण्यात येत आहे. या कृषी संकुलाचे बांधकाम विहित वेळेत म्हणजे ऑगस्ट २०२२ पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.             आज १७ फेब्रुवारी रोजी सुंदरवाटिका भागात बांधण्यात येत असलेल्या स्व.बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषी संकुलाच्या बांधकामाला जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांनी भेट देऊन पाहणी केली.यावेळी संबंधित यंत्रणेला वरील निर्देश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. एम. मिठ्ठेवाड,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व कंत्राटदार श्री.जाधव यावेळी उपस्थित होते.          ५ कोटी ४४ लाख रुपये निधीतून हे कृषी संकुल उभारण्यात येत आहे. या कृषी संकुलामध्ये प्रशिक्षण सभागृह, शेतमाल विक्री केंद्र, ग्रेडिंग अँड पॅकि

साखरा येथील मॉडेल स्कूलच्या बांधकामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

Image
साखरा येथील मॉडेल स्कूलच्या बांधकामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी वाशिम दि.१७ (जिमाका) वाशिम तालुक्यातील साखरा येथे बांधण्यात येत असलेल्या मॉडेल स्कूलच्या बांधकामाला जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी आज १७ फेब्रुवारी रोजी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, उपशिक्षणाधिकारी श्री.डाबेराव,जि. प.सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. पाटील यावेळी उपस्थित होते.       साखरा येथून जवळच असलेल्या २४ एकर जागेत मॉडेल स्कूलची इमारत बांधण्यात येत आहे. २ कोटी ५० लक्ष रुपये निधी इमारतीच्या बांधकामासाठी प्राप्त झाला आहे.या निधीतून १८ वर्गखोल्यांचे बांधकाम सुरू आहे.जून  २०२२ पर्यंत मॉडेल स्कूलच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांनी संबंधित यंत्रणेला यावेळी दिले.येणाऱ्या शैक्षणिक वर्षापूर्वी बांधकाम पूर्ण करण्यात यावे.बांधकामाचा दर्जा उत्तम असावा.बांधकामाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड करू नये.मॉडेल स्कूलच्या अंतर्गत बांधण्यात येणारी रस्ते,वृक्षारोपणाची व पाणीपुरवठ्याची काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळ

इचोरीत रोखला मुलीचा बालविवाह

Image
इचोरीत रोखला मुलीचा बालविवाह वाशिम,दि.१७ (जिमाका) मंगरूळपीर तालुक्यातील इचोरी येथे एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देण्यात येणार असल्याची गुप्त माहिती चाइल्ड लाइनच्या टोल फ्री क्रमांक १०९८ वर मिळाली.त्यावरून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आलोक अग्रहरी यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन बालविवाह थांबविण्याचे निर्देश दिले.              जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कायदा तथा परीविक्षा अधिकारी जिनसाजी चौधरी,तालुका संरक्षण अधिकारी धीरज उचित,चाइल्ड लाइनचे केस वर्कर अविनाश चौधरी,पोलीस विभागाचे श्याम शिंदे,गणेश गर्दै यांनी इचोरी येथे जाऊन ग्राम बाल समिती सोबत चर्चा करून बालिकेच्या घरी जाऊन समुपदेशन करून बालविवाह रोखला. १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच आता मुलीचे लग्न करणार असल्याचे हमीपत्र मुलीच्या पालकांकडून लिहून घेण्यात आले.                   जिल्ह्यात अशा प्रकारचे बालविवाह जर कुठे होत असतील तर ते रोखण्यासाठी चाइल्ड लाइनच्या १०९८ या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा.माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल.असे आवाहन प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिका

दिव्यांग व्यक्ती व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी महाशरद पोर्टल सुरु

Image
दिव्यांग व्यक्ती व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी महाशरद पोर्टल सुरु नोंदणी करण्याचे आवाहन वाशिम,दि.१७(जिमाका) जिल्हयातील दिव्यांग व्यक्ती व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शासनाने महाशरद पोर्टल सुरु केलेले आहे. दिव्यांग व्यक्ती या पोर्टलव्दारे शासनाच्या मंचावर सहाय्य उपलब्ध होण्यासाठी नोंदणी करुन आवश्यक ती मदत सहकार्य मिळवु शकतात. सदर पोर्टल दिव्यांग व्यक्ती,सामाजिक दानशुर व्यक्ती,सामाजिक संस्था,कंपन्या अशासकीय संघटना विनामुल्य जोडणारा दुवा आहे.या पोर्टलव्दारे दिव्यांग व्यक्तींना व्यासपीठ मिळवुन दिले जात आहे.यामध्ये सर्व प्रकारचे दिव्यांग व्यक्ती या पोर्टलवर आपले नाव नोंदवु शकतात दिव्यांग व्यक्ती आणि त्यांना देणगी देऊ ईच्छीणाऱ्या वर्गणीदाराला एकत्र आणून वर्गणीदाराचे सहकार्य या पोर्टलव्दारे मिळविण्यात येत आहे.पोर्टलच्या माध्यमातुन दिव्यांगाना महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळची माहिती तसेच विविधप्रकारच्या माहितीच्या आधारे दिव्यांगाची परिस्थिती आणि गरजा समजुन घेऊन दिव्यांग व्यक्ती अशासकीय संघटना समाज सेवक आणि वर्गणीदार यांना एकाच छताखाली आणण्यात येत आहे.त्याकरीता www.mahasharad.in

ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहीती द्यावी

Image
ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहीती  द्यावी                       न्या.एस.पी.शिंदे वाशिम,दि.१७ (जिमाका) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ यांच्या संयुक्तवतीने १६ फेब्रुवारी २०२२ रोजी श्री. शिवाजी हायस्कुल,वाशिम येथे " ज्येष्ठ नागरीकांसाठी असलेल्या विविध योजना " या विषयावर कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.            प्रास्ताविकातून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या.एस. पी. शिंदे यांनी जेष्ठ नागरिकांनी त्यांचे नातेवाईकांनी दिलेल्या कोणत्याही आमिषाला अथवा आश्वासनांना बळी पडु नये आणि त्यांनी त्यांची मिळकत नातेवाईकांचे नावे करुन देऊ नये असे सांगितले.             जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव अँड.एन.टी.जुमडे यांनी ज्येष्ठ नागरीकांसाठीच्या विविध योजना या विषयावर उपस्थितांना महत्वपुर्ण मार्गदर्शन केले.                कार्यक्रमांचे सुत्रसंचालन विधीज्ञ संघाचे सहसचिव ऍड.कि.जे. सानप यांनी केले.उपस्थितांचे आभार शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुणराव सरनाईक यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी,कर्मचारी तसेच नागरीक उपस्

*जिल्हाधिकाऱ्यांकडून सुपखेला साठवण तलावाच्या कामाची पाहणी*

Image
*जिल्हाधिकाऱ्यांकडून सुपखेला  साठवण तलावाच्या कामाची पाहणी*  वाशिम दि.१७ (जिमाका) जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज १७ फेब्रुवारी रोजी वाशिम तालुक्यातील सुपखेला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाझर तलावाचे साठवण तलावात रुपांतर करण्यात येत असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री.एल.एस. मापारी उपजिल्हा जलसंधारण अधिकारी श्री.राजू कोठेकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्री.व्ही.जी.घुगे व जलसंधारण अधिकारी आर.एन.इंगळे यावेळी उपस्थित होते.              येत्या ३१ मार्चपूर्वी पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्याचे काम पूर्ण करण्यात यावे. हे काम संबंधित कंत्राटदाराकडून चांगल्या पद्धतीने करण्यात यावे. कोणत्याही उणिवा ह्या कामामध्ये राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यांनी यावेळी संबंधित विभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.या तलावाचे साठवण तलावात रुपांतर या कामातून होणार असल्यामुळे आजूबाजूच्या जवळपास १६ हेक्‍टर शेतीला आठमाही सिंचनाची व्यवस्था हे काम पूर्ण झाल्यावर निर्माण होणार आहे.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

Image
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त  विविध स्पर्धांचे आयोजन ·       15 मार्चपर्यंत प्रवेशिका मागविल्या वाशिम, दि. 16 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने सन 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्ताने  ‘माझे मत माझे भविष्य, एका मताचे सामर्थ्य’ ही राष्ट्रीय मतदार जागृत्ती स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेकरीता 15 मार्चपर्यंत प्रवेशिका स्विकारण्यात येणार आहे. यामध्ये प्रश्न मंजूषा, घोषवाक्य, गीत स्पर्धा तसेच व्हिडीओ मेकींग स्पर्धा व पोस्टर डिझाईन स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. वरील स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धेच्या अधीक तपशीलवार माहितीसाठी स्पर्धेची मार्गदर्शक तत्वे, नियम आणि अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळ https://ecisveep.nic.in/contest यावर भेट द्यावी. प्रवेशिका सर्व तपशिलांसह voter-contest@eci. gov.in <mailto:voter-contest@eci.gov.in येथे ई-मेल कराव्यात. स्पर्धेचे नांव आणि श्रेणी याचा विषयात उल्लेख करावा. प्रश्न मंजूषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी. सर्व प्रवेशिका तपशिलांसह voter-contest@eci.gov.in<mailto:voter-con

*२१ व्या शतकातील रोजगाराच्या संधी* १८ फेब्रुवारीला ऑनलाईन वेबिनार

Image
*२१ व्या शतकातील रोजगाराच्या संधी*   १८ फेब्रुवारीला ऑनलाईन वेबिनार  वाशिम दि.१६(जिमाका)  "२१ शतकातील रोजगाराची संधी " या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन वेबीनारचे आयोजन १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ४:३० या वेळेत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे. या विषयावर पर्सिस्टंट सिस्टीमचे मुख्य माहिती अधिकारी डॉ. वेंकटेश्वरन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नाट्य विभागाच्या साहाय्यक प्रा. प्रियंका सीतासावाद,  सिक्वेल इन्फोटेक प्रा.लि.चे मॅनेजिंग पार्टनर अरुण ओझा हे या विषयावर मार्गदर्शन करणार आहे.तरी जिल्ह्यातील युवक-युवतीं या ऑनलाइन व्याख्यानाचा लाभ घ्यावा.     वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी  फेसबुक  -  https://www.facebook.com.MaharashtraSDEED आणि  युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A या  लिंकच्या माध्यमातून सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२१ प्रवेशिकास मुदतवाढ

Image
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार   २०२१    प्रवेशिकास मुदतवाढ ·        28 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन              वाशिम, दि. १ 6  (जिमाका) :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता,उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा,उत्कृष्ट छायाचित्रकार,समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2021 ते 31 डिसेंबर, 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्यास आता 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.            उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2021 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने शासनाच्या  www.maharashtra.gov. in  आणि महासंचालनालयाच्या  dgipr. maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सदर संकेतस्थळावरुन विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल.  राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये 11 राज्यस्तरीय तर, 8 विभागीय स्तरावरील पुरस्कार असे एकूण

मार्जिन मनी योजनेसाठी अर्ज मागविले

Image
मार्जिन मनी योजनेसाठी अर्ज मागविले वाशिम, दि.  १६ (जिमाका)   केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील लाभार्थ्यांकरीता मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली आहे. यासाठी केंद्र शासनाने १० हजार कोटींची तरतूद केली आहे. सदर रक्कम लघु औद्योगिक विकास, बँक ऑफ इंडियाकडे वर्ग करण्यात आली आहे. या बँकेने या रक्कमेची सुरक्षा हमी कवच तयार केले असून लाभार्थ्यांना जे कर्ज दिले जाईल त्याला ही बँक हमी देईल. या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजक यांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित २५ टक्के सबसीडी राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय   www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर निरिक्षणासाठी उपलब्ध आहे.               या योजनेकरीता इच्छुक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, वाशिम यांचेकडे शासन निर्णयात नमुद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पुर्तता करुन प्रस्ताव साद

*सीएसआर निधीतून जिल्हा रुग्णालयाला एक अत्याधुनिक रुग्णवाहिका व दोन व्हेंटिलेटर भेट*

Image
*सीएसआर निधीतून जिल्हा रुग्णालयाला एक अत्याधुनिक रुग्णवाहिका व दोन व्हेंटिलेटर भेट* वाशिम दि.१५(जिमाका) भारत सरकारच्या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या जहाज बांधणी कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) जिल्हा सामान्य रुग्णालयाला नुकतीच एक अत्याधुनिक कार्डियक रुग्णवाहिका आणि दोन नियो नेटल वेंटिलेटर भेट म्हणून दिले. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. धर्मपाल खेळकर,अन्य वैद्यकीय अधिकारी तसेच साथी संस्थेचे प्रतिनिधी रामेश्वर वानखेडे यांची उपस्थिती होती.         ही भेट साथी संस्था दिल्लीच्या माध्यमातून देण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या गंभीर रुग्णाला यावेळी व्हेंटिलेटरचा उपयोग होणार आहे.कोरोना संसर्ग काळात व्हेंटिलेटर व अत्याधुनिक कार्डीयक रुग्णवाहिकेची अत्यंत आवश्यकता असताना या रुग्णवाहिकेचा उपयोग रुग्णाला दवाखान्यात उपचारासाठी आणण्यासाठी होणार आहे.या रुग्णवाहिकेच्या सुविधेमुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाला आराम मिळण्यास मदत होणार आहे.

*न्यायालयीन कामकाज करतांना विधिज्ञांनी कर्तव्यदक्ष असावे*

Image
*न्यायालयीन कामकाज करतांना विधिज्ञांनी कर्तव्यदक्ष असावे*                          ऍड. एस.के.उंडाळ  वाशिम दि.१३(जिमाका) विधिज्ञांनी पक्षकारांना सेवा देताना स्वतःचा आदर राहील असे काम करावे. न्यायालयीन कामकाज करताना विधिज्ञांनी कर्तव्यदक्ष असावे.असे प्रतिपादन ऍड.एस.के.उंडाळ यांनी केले.              १२ फेब्रुवारी रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांच्या संयुक्तवतीने पॅनल विधीज्ञाकरीता आयोजित ऑनलाईन  प्रशिक्षणादरम्यान ऍड. उंडाळ बोलत होते.यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या.संजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.              ऍड.उंडाळ यांनी यावेळी विधिज्ञ म्हणून कोणत्या मूल्यांचे पालन केले पाहिजे तसेच विधिज्ञाचे न्यायालय,पक्षकार, विरुद्ध बाजूचा पक्षकार आणि पक्ष तसेच समाजाप्रती काय कर्तव्य आहे यावर देखील प्रकाश टाकला.        कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव ऍड व्ही.जे. सानप यांनी केले.आभार एस के भुरे यांनी मानले. प्रशिक्षणाचा लाभ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या पॅनलवरील विधिज्ञांनी घेतला.

*पालक सचिवांनी घेतला मग्रारोहयोचा आढावा*

Image
*पालक सचिवांनी घेतला मग्रारोहयोचा आढावा* वाशिम दि.१२(जिमाका) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना,इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव श्री. नंदकुमार यांनी आज १२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृह येथे जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शैलेश हिंगे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.मिठेवाड, जिल्हा जलसंधारण अधिकारी( जि.प) श्री. मापारी, सार्वजनिक बांधकाम विभाग( जि.प) अधिकारी अभियंता श्री खारोडे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारुती वाठ व जिल्हा रेशीम विकास अधिकारी अरविंद मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.           श्री नंदकुमार यावेळी म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ६० टक्के कामे ही वैयक्तिक लाभाची झाली पाहिजे. वैयक्तिक लाभाच्या

आझादी का अमृत महोत्सव सूर्यनमस्कार कार्यशाळा उत्साहात संपन्न

आझादी का अमृत महोत्सव सूर्यनमस्कार कार्यशाळा उत्साहात संपन्न            वाशिम, दि. 11 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 कोटी जागतिक सुर्य नमस्कार घालण्याचा संकल्प यावर्षी करण्यात आला. या निमित्ताने सुर्यनमस्कार कार्यशाळेचे आयोजन क्रीडा विभाग, शालेय शिक्षण विभाग व आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संपुर्ण जिल्हयात यशस्वीरित्या करण्यात आले.              जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने ऑफिसर्स क्लब येथे जागतिक सूर्य नमस्कार कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. भारतरत्न लता मंगेशकर यांना सर्वप्रथम श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. उदघाटन प्रसंगी क्रीडा राज्य मार्गदर्शक बालाजी शिरसिकर, वाशिम जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव सुनील देशमुख, बाकलीवाल विद्यालयाचे स्काऊटर, रवी वानखडे, रमेश घुगे, मार्गदर्शक म्हणुन योगतज्ञ दिपा वानखडे, आयुष विभाग तथा जिल्हा महिला अध्यक्ष पतंलजी योग समिती वाशिम ह्या उपस्थितीत होत्या. या कार्यक्रमाकरीता जिल्ह्यातील विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने तसेच प्रत्यक्ष जिल्हा प्रशिक्षण केंद्र वाशिम येथील खेळाडु कराटे खेळ प्रकाराती

रोजगार नोंदणी कार्ड व कौशल्य विकास मार्गदर्शन 14 फेब्रुवारीला ऑनलाईन वेबीनार

रोजगार नोंदणी कार्ड व कौशल्य विकास मार्गदर्शन 14 फेब्रुवारीला ऑनलाईन वेबीनार    वाशिम, दि. 11 (जिमाका) :आजच्या स्पर्धात्मक युगात उद्योजकता विकास व रोजगार निर्मितीस चालना देणे गरजेचे आहे. मागील दीड-दोन वर्षात कोरोनाच्या संकटात अनेकांना रोजगार गमवावा लागला.अशाच रोजगाराच्या प्रतीक्षेत असणाऱ्या युवावर्गासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिमच्या वतीने रोजगार नोंदणी कार्ड व कौशल्य विकास' मार्गदर्शन सत्राचे ऑनलाईन आयोजन १४ फेबुवारी २०२२ रोजी दुपारी 1 वाजता करण्यात आले आहे.           वनोजा येथील श्रीमती साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालय येथे हे सत्र आयोजित करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत शासकीय रोजगार कार्डाची नोंदणी कशी करावी, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, कार्ड निर्मितीची ऑनलाईन सुविधा तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या स्वंयरोजगार कर्ज योजनेसह इतर शासकीय योजनांची माहिती दिली जाईल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह रोजगारासाठी प्रयत्नशील असलेल्या अन्य इच्छुक युवक-युवतींनी या उपक्रमा

जिल्ह्यात 25 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

जिल्ह्यात 25 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश           वाशिम ,   दि.   11  (जिमाका) :   जिल्हयात 9 ते 17 फेब्रुवारीपर्यंत श्री. अवलीया महाराज संस्थान काळामाथा ता. मालेगाव आणि‍ 19 ते  28 फेब्रुवारीपर्यंत श्री.बिरबलनाथ महाराज संस्थान मंगरुळपीरचा यात्रा उत्सव आहे. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती जिल्ह्यात सर्वत्र साजरी करण्यात येणार आहे. जिल्हा जातीयदृष्टया संवेदनशील आहे. नजीकच्या काळात शेजारच्या जिल्हयात घडलेल्या जातीय घटनेच्या प्रतिक्रीया आगामी काळात जिल्हयात उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात ओमिक्रॉन/कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत प्रतिबंधात्मक निर्देश देण्यात आले आहे.            सद्यस्थितीत राज्यात एस.टी. महामंडळ कर्मचारी यांचा महामंडळास राज्य शासनात समावेश करण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन सुरु आहे. राज्यात नोकरीमध्ये पदोन्नतीस मागासवर्गीयांना 33 टक्के आरक्षण कायम ठेवावे या मागणीसाठी विविध कर्मचारी संघटनांकडून विविध प्रकारच्या आंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहे. एमएसपी कायदा लागू करणे, शेतकरी कर्जमाफी,

आजपासून इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग सुरु

आजपासून इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग सुरु           वाशिम,   दि.  09  (जिमाका) :  जिल्हयात कोरोना व ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग कमी होत असल्यामुळे आज 10 फेब्रुवारीपासून जिल्हयातील इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग ऑफलाईन पध्दतीने प्रत्यक्षरित्या सुरु ठेवण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिले आहे. शासनाने राज्यातील शाळा व महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्देश यापूर्वी दिले होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी 31 जानेवारी 2022 नुसार जिल्हयातील इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा तसेच सर्व अकृषी विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, समूह विद्यापीठे, तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थांमधील नियमित वर्ग 1 फेब्रुवारी 2022 पासुन प्रत्यक्षरित्या सुरु ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.                जिल्हयात लसीकरणाच्या पहिल्या डोसची टक्केवारी 80.46 टक्के व दुसऱ्या डोसची टक्केवारी 59.36 टक्के इतकी आहे. त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार१४ फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव मागविले

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार १४ फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव मागविले           वाशिम, दि. ०९ (जिमाका) :  सन २०२१-२२ या वर्षाकरिता जिल्हयातील वीरशैव-लिंगायत समाजाचा सामाजिक,शैक्षणिक व आर्थिकदृष्टया विकास होण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, कलात्मक, सांस्कृतिक, समाज प्रबोधन व साहित्यीक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यीक, समाज प्रबोधनकार व समाज सेवक व त्यासाठी कार्य करणाऱ्या संस्था यांच्याकडुन महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराकरीता विहीत नमुन्यात १४ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.               पुरस्कारासाठी व्यक्तीची पात्रता पुढीलप्रमाणे असावी.या योजनेनुसार वीरशैव-लिंगायत समाजाकरीता समाज कल्याण, समाज संघटनात्मक, कलात्मक, आध्यात्मिक प्रबोधन आणि साहित्यिक क्षेत्रात कार्य करणारे तथा कल्याणासाठी झटणाऱ्या नामवंत, समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यीक असावेत. तसेच समाज सेवक पुरुष असल्यास वय ५० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे. स्त्री असल्यास वय ४० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे. समाज सेवक यांच्या समाज कार्याचा

अनेक कुटूंबे सावरली पोलिसांनी शोधले हरविलेले १५२ पुरुष व २३९ महिला

अनेक कुटूंबे सावरली पोलिसांनी शोधले हरविलेले १५२ पुरुष व २३९ महिला           वाशिम, दि. ०९ (जिमाका) :  पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांच्या कुशल मार्गदर्शनात जिल्हयात पोलिस विभाग अनेक उपक्रम राबवित आहेत. महिला व मुलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथकाची स्थापना करुन गरजूंना विहीत वेळेत मदत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच पिडीत व गरजू संकटकाळात सापडलेल्या व्यक्तींना तात्काळ मदतीसाठी  डायल ११२ ची स्थापना करण्यात आली असून त्याला नागरीकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महिला व मुलीसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहे. जिल्हयात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे. नियंत्रण कक्ष वाशिम येथे मिसींग डेस्क कार्यान्वीत करण्यात आला आहे.त्यामाध्यमातून हरविलेल्या महिला व पुरुषांचा शोध घेण्याकरीता सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे.                जिल्हयात सन २०२१ मध्ये १८ वर्षावरील एकूण १८७ पुरुष हरविले. त्यापैकी १५२ पुरुषांचा शोध लावण्यात आला. हरविलेल्या २९० महिलांपैकी २३८ महिलांचा शोध लावण्यात आला आहे. मिसींग डेस्कव्दारे सन २०२१ या कालावधीत ५१ महिला,७ मुली, २ मुले व १४ पुरुषांचा शोध

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना निवासी शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश २५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना निवासी शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश २५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले           वाशिम, दि. ०९ (जिमाका) :   जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत निवासी शाळेमध्ये इयत्ता १ ली व २ रीत प्रवेश  घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याकडुन प्रवेश अर्ज विनामुल्य प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचे कार्यालय तसेच नजीकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत उपलब्ध आहे. कोणत्याही भुलथापांना बळी न पडता व कोणाच्याही माध्यमातुन प्रवेश अर्ज प्राप्त करुन न घेता या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा. तसेच नजीकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतून प्रवेश अर्ज प्राप्त करुन कार्यालयास सादर करावा. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतीम तारीख २५ फेब्रुवारी २०२२ आहे.               इयत्ता १ ली व इयत्ता २ री मध्ये प्रवेश घेण्यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे. या योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. पालकाने विद्यार्थ्यांचे नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकीत प्रत सादर करावी. जर वि

*लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा* *सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर*

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) *लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा* *सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर* मुंबई दि. ६:  भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी  रोजी राज्यात  दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. 

राज्यपाल कोश्यारी यांची कारंजा गुरु मंदिराला भेट

Image
राज्यपाल कोश्यारी यांची कारंजा गुरु मंदिराला भेट            वाशिम, दि. ०५ (जिमाका) :  जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज कारंजा येथील प्रसिद्ध श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदीर अर्थात गुरु मंदीराला भेट देऊन गुरु माऊलींचे दर्शन घेतले. यावेळी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थानतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.              विश्वस्त मंडळातर्फे आशा सोनटक्के, सुरेखा घुडे, स्मिता बरडे, मिनाक्षी खेडकर व श्रद्धा घुडे यांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. वेद पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी शांतीपाठ केला. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नारायणराव खेडकर, वसंत स्वस्तकर, विनायक सोनटक्के, दिगंबर बरडे, कृष्णराव नांदेडकर, प्रकाश घुडे, अविनाश खेडकर, अतुल बरडे व निलेश घुडे यांची यावेळी उपस्थिती होती. गुरुमाऊलींच्या दर्शनाने आपण धन्य झालो अशी प्रतिक्रीया व्यक्त करतांनाच गुरुमाऊली सर्व जगाचे कल्याण करो, अशी प्रार्थनाही यावेळी राज्यपालांनी केली.  आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकार

सिंचन प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करा - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Image
सिंचन प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करा                                                                         - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी           वाशिम, दि. ०५ (जिमाका) :  जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण वाढविण्यासाठी अपूर्ण प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत तसेच जलसंधारणाच्या योजनाही अधिक प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिले.              राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आज 5 फेब्रुवारी रोजी वाशिम जिल्ह्यातील विविध स्थळांना भेट दिली. या दौऱ्यादरम्यान राज्यपालांनी येथील शासकीय विश्रामगृहावर जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन विविध बाबींचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांची प्रमुख उपस्थिती होती.              वाशिम हा आकांक्षित जिल्हा असून येथे राबविण्यात येत असलेल्या विविध विकास योजनांची माहिती श्री. कोश्यारी यांनी यावेळी घेतली. ते म्हणाले, जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी जलसंधारणाची कामे व्यापक प्रमाणावर राबवावीत. इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅ

राज्यपाल कोश्यारी यांची अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिराला भेट

Image
राज्यपाल कोश्यारी यांची अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिराला भेट           वाशिम, दि. ०५ (जिमाका) :  जिल्हयातील शिरपूर (जैन) येथील प्रसिध्द अंतरिक्ष पार्श्वनाथ महाराज मंदिराला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज भेट दिली.               राज्यपालांसोबत आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अमित झनक,आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, श्री. विजयहंस विजयजी महाराज, श्री. परमहंस विजयजी महाराज, अंतरिक्ष पार्श्वनाथ महाराज संस्थानचे ललितकुमार जयसिंग धामी, दिलीपकुमार नवलचंद शहा, कांतिलाल चंदनमल बरडिया, पारसमल गोलेछा, शिखरचंद बागरेचा, मनिष संचेती, अशोक भंसाळी, दिगंबर जैन संस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष चवरे, सचिव संजय कान्हेड, व्यवस्थापक बाबुराव बोराटे, रवि बज, समीर जोहरापूरकर, हरिष बज, देवेंद्र महाजन, राहुल मनारकर आदी उपस्थित होते. यावेळी संस्थानच्या दोन्ही ट्रस्टतर्फे राज्यपालांचा सत्कार करण्यात आला.              या तिर्थस्थळाचा विकास करण्यात यावा, तसेच इथे येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात अशा सूचना राज