रक्तदान करा व जीवन वाचवाशासकीय रक्तपेढीमध्ये रक्तदान करण्याचे आवाहन

रक्तदान करा व जीवन वाचवा

शासकीय रक्तपेढीमध्ये रक्तदान करण्याचे आवाहन

वाशिम, दि. ०१ (जिमाका) : जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथील जीवन अमृत शासकीय रक्तपेढीमध्ये दररोज २५ ते ३० रक्तपिशव्यांची मागणी असते. परंतू रक्तपेढीमध्ये पुरेशा रक्तसाठा उपलब्ध नसल्यामुळे रक्ताचा तुटवडा होत आहे.त्यामुळे अत्यंत गरीब,गरोदर माता, सिकलसेल,थालासेमिया, हिमोफेलियाग्रस्त रूग्णांना शासकीय रक्तपेढीकडून मागणीनुसार रक्त पुरवठा होत नाही.जिल्हा शासकीय रक्तपेढीअंतर्गत विविध आजाराच्या रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्यात येतो.तसेच स्वइच्छूक रक्तदाता कार्डवर खासगी रुग्णालयातील भरती असणाऱ्या इतर रुग्णांनासुध्दा मोफत रक्तपुरवठा करण्यात येतो. परंतू रक्तपेढीमध्ये पुरेसा रक्तसाठा उपलब्ध नसल्यामुळे गरजू रुग्णांना रक्तपुरवठा करणे शक्य होत नाही.

जिल्हयातील सर्व सामाजिक, राजकीय, प्रशासकीय कार्यालय तसेच सेवाभावी संस्था,कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालये यासह विविध रक्तदान शिबीर आयोजक यांना आवाहन करण्यात येते की,त्यांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करण्यासाठी रक्तपेढीमध्ये रक्त संकलन करण्यास सहकार्य करावे.असे आवाहन प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सी. के.यादव, जिल्हा संक्रमण अधिकारी डॉ. हरीदास मुंडे, रक्तपेढी प्रमुख डॉ. प्रकाश मोरे, डॉ. डी.बी. खेळकर व जनसंपर्क अधिकारी सचिन दंडे यांनी केले आहे.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे