जिल्ह्यातील नागरिक व विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्यास संपर्क साधावा

 

जिल्ह्यातील नागरिक व विद्यार्थी

युक्रेनमध्ये अडकले असल्यास संपर्क साधावा

          वाशिम, दि. २5 (जिमाका) : रशिया आणि युक्रेन या देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेन या देशात भारतीय नागरिक/विद्यार्थी अडकले असण्याची शक्यता आहे. दिल्ली येथे नागरिकांसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली टोल फ्री क्रमांक- १८००११८७९७, फोन ०११-२३०१२११३/२३०१४१०४/२३०१७९०५ आणि ई-मेल-situationroom@mea.gov.in यावर आणि वाशिम जिल्ह्यातील कोणतेही नागरिक/ विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम फोन नं.०७२५२-२३४२३८, मोबाईल क्रमांक-८३७९९२९४१५, ईमेल - rdc_washim@rediffmail.com  तसेच जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे ०७२५२ - २३४८३४ आणि मोबाईल नं.८६०५८७८२५४ यावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे