कोरोना सानुग्रह अनुदान *२६० मृतांच्या वारसांकडून कागदपत्रे मागविली* २४ फेब्रुवारीला वाशिम येथे शिबिर

कोरोना सानुग्रह अनुदान

*२६० मृतांच्या वारसांकडून कागदपत्रे मागविली*

 २४ फेब्रुवारीला वाशिम येथे शिबिर 

वाशिम दि.१९( जिमाका) कोविड -१९ मुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्ह्यात कोविडमुळे आतापर्यंत ६४० व्यक्तींचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ३८० मृतांच्या वारसांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी अर्ज केले आहे. उर्वरित २६० मृतांच्या वारसांनी अद्यापही सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी अर्ज केलेला नाही. तरी या वारसांनी येत्या २४ फेब्रुवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित शिबिरात आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.
           मृत्युमुखी पडलेल्या उर्वरित २६० व्यक्तींच्या वारसाने अर्थात अर्जदाराने स्वतःचे आधारकार्ड व त्याची साक्षांकित झेरॉक्स प्रत, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे आधारकार्ड व त्याची साक्षांकित प्रत, मृत्यु प्रमाणपत्र, बँकेचे स्टेटमेंट किंवा धनादेश, कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा आरटीपीसीआर चाचणीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट तसेच कोविडमुळे मृत्यू झाल्याबाबतचे कागदपत्र अर्जदाराकडे उपलब्ध आहे ते-ते सर्व कागदपत्रे शिबिराला सोबत घेऊन यावे.
           आता फक्त २६० मृत व्यक्तींच्या वारसांनाच ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी अर्ज करावे. याबाबतची यादी तहसीलदार यांच्याकडे तसेच राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या( एन.आय.सी ) संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शिबिरात अर्जदारालाराकडील  कागदपत्रे घेऊन संबंधित संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे. तरी २६० मृत व्यक्तींच्या वारसांनी ज्यांनी अद्यापही 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी अर्ज केला नाही,त्यांनीच आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज २४ फेब्रुवारीला प्रत्यक्ष उपस्थित राहून शिबीरात सादर करावा.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे