राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त

 विविध स्पर्धांचे आयोजन

·       15 मार्चपर्यंत प्रवेशिका मागविल्या

वाशिम, दि. 16 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने सन 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्ताने  ‘माझे मत माझे भविष्य, एका मताचे सामर्थ्य’ ही राष्ट्रीय मतदार जागृत्ती स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेकरीता 15 मार्चपर्यंत प्रवेशिका स्विकारण्यात येणार आहे. यामध्ये प्रश्न मंजूषा, घोषवाक्य, गीत स्पर्धा तसेच व्हिडीओ मेकींग स्पर्धा व पोस्टर डिझाईन स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे.

वरील स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धेच्या अधीक तपशीलवार माहितीसाठी स्पर्धेची मार्गदर्शक तत्वे, नियम आणि अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळ https://ecisveep.nic.in/contest यावर भेट द्यावी. प्रवेशिका सर्व तपशिलांसह voter-contest@eci. gov.in <mailto:voter-contest@eci.gov.in येथे ई-मेल कराव्यात. स्पर्धेचे नांव आणि श्रेणी याचा विषयात उल्लेख करावा. प्रश्न मंजूषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी.

सर्व प्रवेशिका तपशिलांसह voter-contest@eci.gov.in<mailto:voter-contest@eci.gov.in या ईमेलवर पाठविण्यात याव्यात. भारत निवडणूक आयोगाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे