जास्तीत जास्त प्रकरणे मध्यस्थीने मिटवावीत न्या.श्रीमती एस. एस. सावंत
जास्तीत जास्त प्रकरणे मध्यस्थीने मिटवावीत
वाशिम, दि. २२ (जिमाका) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांच्या संयुक्तवतीने जिल्हा न्यायालय येथे मध्यस्थी संबंधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन आज २२ फेब्रुवारी रोजी करण्यात आले.यामध्ये मध्यस्थी प्रक्रीयेतील विविध टप्पे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव एस. पी. शिंदे यांनी केले.न्या.श्रीमती एस. जी. फुलबांधे,व ऍड.एस.एन.काळु यांनी मध्यस्थी प्रकीयेतील विविध टप्पे काय आहेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा न्या.श्रीमती एस. एस. सावंत यांनी उपस्थितांना त्यांचे तंटे मध्यस्थीच्या माध्यमातुन मिटविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला न्या.एस.एम.मेनजोगे, तसेच जिल्हा न्यायालयातील न्यायीक अधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन/न्या. श्रीमती सुप्रिया देशमुख यांनी केले. आभार जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव ऍड.एन टी.जुमडे यांनी मानले. या कार्यक्रमाला जिल्हा विधीज्ञ संघाचे कोषाध्यक्ष ऍड श्री.सावळे विविध बँकांचे प्रतिनिधी,कर्मचारी, विधीज्ञ, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच पक्षकार उपस्थित होते.
*******
Comments
Post a Comment