रोजगार नोंदणी कार्ड व कौशल्य विकास मार्गदर्शन 14 फेब्रुवारीला ऑनलाईन वेबीनार
रोजगार नोंदणी कार्ड व कौशल्य विकास मार्गदर्शन
14 फेब्रुवारीला ऑनलाईन वेबीनार
वाशिम, दि. 11 (जिमाका) :आजच्या स्पर्धात्मक युगात उद्योजकता विकास व रोजगार निर्मितीस चालना देणे गरजेचे आहे. मागील दीड-दोन वर्षात कोरोनाच्या संकटात अनेकांना रोजगार गमवावा लागला.अशाच रोजगाराच्या प्रतीक्षेत असणाऱ्या युवावर्गासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिमच्या वतीने रोजगार नोंदणी कार्ड व कौशल्य विकास' मार्गदर्शन सत्राचे ऑनलाईन आयोजन १४ फेबुवारी २०२२ रोजी दुपारी 1 वाजता करण्यात आले आहे.
वनोजा येथील श्रीमती साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालय येथे हे सत्र आयोजित करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत शासकीय रोजगार कार्डाची नोंदणी कशी करावी, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, कार्ड निर्मितीची ऑनलाईन सुविधा तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या स्वंयरोजगार कर्ज योजनेसह इतर शासकीय योजनांची माहिती दिली जाईल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह रोजगारासाठी प्रयत्नशील असलेल्या अन्य इच्छुक युवक-युवतींनी या उपक्रमात सहभागी व्हावे. रोजगार कार्डची नोंदणी विनामुल्य करून दिली जाईल. असे सहायक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी कळविले आहे.
शासकीय, निमशासकीय कार्यालयात नोकरीसाठी अर्ज करतांना, स्वंरोजगारासाठी शासकीय अर्थसहाय्य प्राप्तीसाठी तसेच खाजगी आस्थापनेत नोकरी मिळविण्यासाठी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी या कार्डाची आवश्यकता असते. खालील लिंकव्दारे सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा. https://meet.google.com/jmp-nhcy-num या लिंकवर क्लिक करून या सत्रास जॉईन करावे. या वेबिनारसाठी काही अडचणी असल्यास ०७२५२-२३१४९४ या क्रमांकावर संपर्क करावा. अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम या कार्यालयास संपर्क करावा.
***
Comments
Post a Comment