कैद्यांना मोफत विधी सहाय्य दिले जाते - न्या. संजय शिंदे

कैद्यांना मोफत विधी सहाय्य दिले जाते

                                                - न्या. संजय शिंदे.

वाशिम, दि. ०3 (जिमाका) : कैद्यांना कोणत्याही प्रकारची फी न आकारता मोफत विधीज्ञ देऊन विधी सहाय्य दिले जाते असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. संजय शिंदे यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कारागृह वाशिम येथे ०२ फेब्रुवारी रोजी कैद्यांकरीता कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन न्या. शिंदे बोलत होते. अॅड. जी. ए, लव्हाळे यांनी विनंती सौदा या विषयावर उपस्थित कैद्यांना मार्गदर्शन केले. सात वर्षापर्यंत शिक्षा असलेल्या प्रकरणातील आरोपींनी त्यांची प्रकरणे विनंती सौदाच्या माध्यमातुन निकाली काढावीत असे ॲड. लव्हाळे यांनी सांगीतले. यावेळी जिल्हा कारागृहाचे अधिक्षक सोमनाथ पाडुळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी बि. एन. राऊत, तुरुंगाधिकारी सतिश हिरेकर तसेच जिल्हा विधीज्ञ संघाचे सहसचिव अॅड. व्हि. जे. सानप व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे